हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे कोंडा जास्त होतो. या दिवसात केस कसे धुता हे खूप महत्वाचं ठरतं. केसांच्या स्वच्छतेसाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुणं आवश्यक आहे. यामुळे टाळू स्वच्छ राहतो आणि बुरशी वाढण्याची शक्यता कमी होते. याव्यतिरिक्त, दर दोन आठवड्यांनी अँटी-डँड्रफ शाम्पूचा वापर करा.
Skin Care: निस्तेज त्वचा दिसेल चमकदार, नैसर्गिक फेस टोनरचा करा वापर
advertisement
अँटी-डँड्रफ शाम्पूमधे असलेल्या कीटोकोनाजोल, सिक्लोपीरोक्स, सेलेनियम सल्फाइड हे घटक केसांच्या, टाळूच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे आहेत. हे घटक डोक्यातला कोंडा होण्याचं एक प्रमुख कारण असलेल्या बुरशीचं प्रमाण कमी करण्यास मदत करतात. हा शाम्पू कमीत कमी दोन-तीन मिनिटं टाळूवर राहू द्या.
केसांना तेल लावल्यानं कोंडा कमी होतो असं म्हटलं जात असलं तरी, प्रत्यक्षात त्याचा उलट परिणाम होऊ शकतो. कोंडा असताना टाळूला तेल लावल्यानं बुरशीची वाढ आणखी होऊ शकते.
Health Tips: हिवाळ्यासाठी या टिप्स लक्षात ठेवा, या मसाल्यांमुळे नाक होईल मोकळं
अँटी-डँड्रफ शाम्पूमुळे अनेकदा टाळू आणि केस कोरडे होतात, ज्यामुळे केस तुटतात आणि कोरडे होतात. हे टाळण्यासाठी, प्रत्येक शाम्पूनंतर चांगलं कंडिशनर लावा. यामुळे केस मऊ होतात तसंच यामुळे टाळूलाही चांगलं मॉइश्चरायझेशन मिळतं. आवडत असेल तर आठवड्यातून एकदा डीप कंडिशनिंग हेअर मास्क देखील लावू शकता.
