Health Tips : धुरक्याच्या त्रासापासून होईल सुटका, या टिप्समुळे प्रकृती राहिल चांगली
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
खराब हवेमुळे श्वास घेण्यास त्रास होतो, ज्यामुळे अनेकांना नेहमीपेक्षा जास्त खोकला येतो, घशात जळजळ होते, डोकेदुखी होते किंवा छातीत जडपणा येतो. थंडीच्या हवेत फुफ्फुसांना बळकटी देण्यासाठी, तुमच्या आहाराची काळजी घेणं देखील महत्त्वाचं आहे. यासाठी, स्वयंपाकघरातले काही मसाले उपयुक्त ठरू शकतात.
मुंबई : दरवर्षी, नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्याच्या सुमारास हवेत बदल होतात. अनेक भागात धुकं जाणवतं तर अनेक भागात धूर आणि धुक्यामुळे धुरक्याचा त्रास जाणवायला सुरुवात होत. धुरक्यामुळे शरीरावर गंभीर आरोग्य परिणाम जाणवतात, ज्यामुळे अनेकदा घसा आणि छातीत अस्वस्थता जाणवते.
खराब हवेमुळे श्वास घेण्यास त्रास होतो, ज्यामुळे अनेकांना नेहमीपेक्षा जास्त खोकला येतो, घशात जळजळ होते, डोकेदुखी होते किंवा छातीत जडपणा येतो. थंडीच्या हवेत फुफ्फुसांना बळकटी देण्यासाठी, तुमच्या आहाराची काळजी घेणं देखील महत्त्वाचं आहे. यासाठी, स्वयंपाकघरातले काही मसाले उपयुक्त ठरू शकतात.
advertisement
हळद - हळद म्हणजे भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा प्रमुख मसाला. हळदीमध्ये दाहक-विरोधी आणि जीवाणूरोधी गुणधर्म प्रदूषित हवेमुळे होणारी जळजळ कमी करण्यास मदत करतात. हळद रक्तसंचय कमी करून हवेतील जळजळीशी लढण्यास देखील मदत करते.
आलं - आल्याचा चहा आवडणार नाही असे लोक कमी असतात. हा चहा केवळ हिवाळ्यातच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर असतो. आल्याचा मूळ गुण गरम आहे. त्यामुळे ते धुक्यामुळे होणारे त्रास जसं की घसा खवखवणे किंवा छातीत जडपणा कमी करण्यास मदत करू शकते. यातले पोषक घटक श्वसनमार्गातील सूज कमी करण्यासाठी, श्लेष्मा साफ करण्यासाठी आणि सततच्या खोकल्यापासून आराम देण्यास मदत करतात.
advertisement
तुळशीची पानं - श्वासोच्छवासाच्या समस्या जाणवत असतील तर तुळशीची पानं उपयुक्त आहेत. ही पानं विशेषतः धुक्यासारख्या हवामानात फायदेशीर आहेत. यातले अँटीमायक्रोबियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि डिटॉक्सिफायिंग गुणधर्मांमुळे घसा खवखवणं आणि छातीत दुखणं कमी करण्यास मदत होते.
काळी मिरी - हिवाळ्यात नेहमी होतो तो त्रास म्हणजे नाक बंद होणं. नाक मोकळं करण्यासाठी काळी मिरी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे शरीरातील श्लेष्मा बाहेर काढण्यास मदत करते, ज्यामुळे हवेचा प्रवाह सुधारतो. यामुळे रक्ताभिसरण देखील सुधारतं, ज्यामुळे प्रदूषित हवेच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यानंतर छातीत जळजळ कमी होते.
advertisement
ज्येष्ठमध - खोकला कमी करणाऱ्यासाठी ज्येष्ठमध पूर्वीपासून वापरला जातो. धुक्याच्या हंगामात होणाऱ्या समस्या, घसा खवखवणं आणि सततचा कोरडा खोकला यापासून सुटका करुन घेण्यासाठी ज्येष्ठमध उपयुक्त आहे.
यामुळे श्वसनसंस्थेला आराम मिळतो आणि प्रदूषित हवेमुळे होणारी सततची जळजळ कमी करण्यास मदत करते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 25, 2025 2:14 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : धुरक्याच्या त्रासापासून होईल सुटका, या टिप्समुळे प्रकृती राहिल चांगली


