Black Raisins : काळ्या मनुका खाण्याचे आरोग्यदायी फायदे, प्रकृतीसाठी वरदान असलेला सुकामेवा

Last Updated:

काळ्या मनुकांमुळे पचन सुधारतं, थकवा दूर होतो, तसंच मनुका रक्त वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरतात. पण जास्त मनुका खाणं हानिकारक ठरु शकतं. जाणून घेऊया सविस्तर

News18
News18
मुंबई : आरोग्यासाठी सुका मेवा पोषक आहे. यातील प्रत्येक घटकात शरीरासाठी आवश्यक पोषक घटक आहेत. त्यातलाच एक सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.
काळ्या मनुकांमुळे पचन सुधारतं, थकवा दूर होतो, तसंच मनुका रक्त वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरतात. जाणून घेऊया सविस्तर
पचन सुधारतं - काळ्या मनुकांमधे थंडावा असतो, गोड आणि क्षारीय गुणधर्म असल्याचं आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे. पोटाची जळजळ, छातीत जळजळ आणि तोंडाच्या अल्सरपासून यामुळे आराम मिळतो. यातल्या फायबरमुळे पचनक्रिया मजबूत होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. पोट बिघडणं किंवा वेळोवेळी गॅस, आम्लता किंवा तोंडात अल्सर यासारख्या समस्या जाणवत असतील तर आहारात काळ्या मनुका जरुर खा.
advertisement
थकवा - काळ्या मनुका थकवा दूर करतात. दिवसभर शारीरिक किंवा मानसिक ताण येत असेल, लवकर थकवा येत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल, तर काळ्या मनुका अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि ऊतींच्या पुनर्प्राप्तीसाठीही मदत होते.
advertisement
अँटिऑक्सिडंट्स - काळ्या मनुकांमधे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, लोह आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे त्वचा उजळवण्यास, केस मजबूत करण्यास मदत होते. काळ्या मनुका नियमित खाल्ल्यानं त्वचेला नैसर्गिक चमक मिळते आणि केस जाड होतात.
रक्त वाढवण्यास उपयुक्त - काळे मनुके हे लोहाचा चांगला स्रोत आहेत. यामुळे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते आणि अशक्तपणा असलेल्यांसाठी या फायदेशीर ठरू शकतात. महिलांनी विशेषतः त्यांच्या आहारात त्यांचा समावेश करावा.
advertisement
हृदय आणि हाडांसाठी उपयुक्त - याव्यतिरिक्त, काळ्या मनुक्यांमधे आढळणारे पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देतात. कॅल्शियम आणि बोरॉन सारखी खनिजं हाडं मजबूत करण्यास मदत करतात. म्हणून, वयानुसार दररोज काळे मनुके खाणं अधिक फायदेशीर ठरू शकतं.
advertisement
दररोज 8-10 काळ्या मनुका खाणं पुरेसं आहे. काळ्या मनुक्यात नैसर्गिक साखर असते, जी मोठ्या प्रमाणात हानिकारक असू शकते. त्यामुळे खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. मनुका रात्रभर भिजवून ठेवणं आणि सकाळी खाल्ल्यानंतर ते पाणी पिण्यानं पचन सुधारतं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Black Raisins : काळ्या मनुका खाण्याचे आरोग्यदायी फायदे, प्रकृतीसाठी वरदान असलेला सुकामेवा
Next Article
advertisement
Dharmendra News:  धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून,  हे खास गुपित!
धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित
  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

View All
advertisement