Skin Care : स्किन डिटॉक्स करता येते का ? प्रसिद्ध सौंदर्यतज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याचा करा उपयोग, चेहरा दिसेल स्वच्छ
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
आयुर्वेदाच्या मते, शरीरातील काही घटकांचं संतुलन बिघडतं तेव्हा विषारी पदार्थ जमा होऊ लागतात यामुळे चेहऱ्यावर पुरळ येणं, जळजळ होणं अशी लक्षणं दिसतात. हे प्रमाण कमी करण्यासाठी सौंदर्यतज्ज्ञ शहनाज हुसैन यांनी दिलेल्या स्किन डिटॉक्सचा उपयोग होऊ शकतो.
मुंबई : त्वचेवर पुरळ, लालसरपणा येत असेल किंवा त्वचेवर जळजळ होत असेल तर हे शरीरात काहीतरी घडल्याचे संकेत असू शकतात. बहुतांश वेळा, शरीरात विषारी पदार्थ जमा झाल्याचं हे लक्षण असू शकतं.
आपलं शरीर त्वचेच्या छिद्रांमधून हे विषारी पदार्थ बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं, ज्यामुळे मुरुम आणि पुरळ उठतात.
आयुर्वेदाच्या मते, शरीरातील काही घटकांचं संतुलन बिघडतं तेव्हा विषारी पदार्थ जमा होऊ लागतात यामुळे चेहऱ्यावर पुरळ येणं, जळजळ होणं अशी लक्षणं दिसतात. हे प्रमाण कमी करण्यासाठी सौंदर्यतज्ज्ञ शहनाज हुसैन यांनी दिलेल्या स्किन डिटॉक्सचा उपयोग होऊ शकतो.
advertisement
शरीराला भरपूर द्रवपदार्थ देणं ही यातली सगळ्यात मोठी टिप. कोमट पाणी पिणं आणि हळद, तुळस आणि आलं वापरून बनवलेला हर्बल टी, विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो.
आहार हा तुमच्या त्वचेच्या आरोग्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यात संपूर्ण धान्य, हंगामी फळं आणि हळद आणि आवळा यासारखे इतर पोषक घटक आवश्यक आहेत. पालक आणि केल किंवा कारलं या भाज्याही चेहऱ्यासाठी उपयुक्त आहेत.
advertisement
गोड, तेलकट, तळलेले पदार्थ आणि थंड पेयं यांचं सेवन मर्यादित करा, कारण यामुळे शरीरातील दोष संतुलन बिघडू शकतात.
आहारात त्रिफळा समाविष्ट केल्यानं पचनाला मदत होते आणि विषारी पदार्थांपासून मुक्त होण्यासाठी ते चांगलं आहे.
त्वचेला मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्याची आणि योग्य रक्ताभिसरण वाढवण्याची आवश्यकता असते, ज्यासाठी ब्रशिंग आवश्यक असतं. या प्रक्रियेत मऊ ब्रिसल्सनी त्वचा हळूवारपणे स्क्रब करता येईल. वरच्या दिशेने स्ट्रोक वापरून बॉडी ब्रशनं ब्रश केल्यानं लिम्फॅटिक ड्रेनेज होतं आणि मृत त्वचेच्या पेशी बाहेर पडतात.
advertisement
शरीर आणि चेहऱ्यासाठी अभ्यंग किंवा तेल मालिश केल्यानं त्वचेतील विषारी पदार्थ काढून टाकले जातात. आयुर्वेदानुसार, वातदोषासाठी तीळाचं तेल, पित्तदोषासाठी नारळाचं तेल आणि कफदोषासाठी मोहरीचं तेल अशी कोमट तेलं वापरण्याचा सल्ला दिला जातो.
स्किनकेअर हर्बल मास्क
• कडुनिंब आणि हळदीचा फेस मास्क लावल्यानं विषारी पदार्थ निघून जातात आणि दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणाऱ्या गुणधर्मांमुळे त्वचेला आराम मिळतो.
advertisement
• पित्त त्वचेसाठी चंदन आणि गुलाबजल यांचं मिश्रण लावणं खूप चांगलं आहे, कारण यामुळे सूज कमी होते आणि त्वचेला थंडावा मिळतो.
• हळद किंवा उटण्यापासून बनवलेले हर्बल स्क्रब सौम्य एक्सफोलिएशनसाठी आणि लालसरपणा कमी करण्यासाठी आणि त्वचा उजळवण्यासाठी चांगले पर्याय आहेत.
• मुलतानी मातीचे फेस पॅकही त्वचेच्या आरोग्यासाठी चांगला पर्याय आहे.
advertisement
• चेहऱ्यावर वाफ घेण्यामुळे त्वचा स्वच्छ होते. स्वेदाना तंत्रात गरम पाण्यात कडुनिंब आणि तुळशीची पानं गुलाबाच्या पाकळ्यांमधे मिसळून चेहरा वाफवण्याचा सल्ला दिला जातो. या उपायामुळे त्वचेची छिद्र मोकळी करण्यास आणि त्वचा स्वच्छ करण्यास मदत होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 24, 2025 6:40 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : स्किन डिटॉक्स करता येते का ? प्रसिद्ध सौंदर्यतज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याचा करा उपयोग, चेहरा दिसेल स्वच्छ


