Cortisol : कॉर्टिसोल कमी करणं शक्य आहे का ? ताण कमी करण्यासाठी काय करता येईल ?

Last Updated:

आपली जीवनशैली, ज्यात झोप, कॅफीन, मूड, व्यायाम आणि भावनिक स्थिती या सगळ्याचा कॉर्टिसोलवर थेट परिणाम होतो असं NIH च्या अभ्यासातून आढळून आलं आहे. म्हणून, छोट्या सवयी सुधारणं हा नैसर्गिकरित्या कॉर्टिसोल कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.

News18
News18
मुंबई : आपल्या शरीरातील अनेक महत्त्वाच्या संप्रेरकांपैकी एक म्हणजे कॉर्टिसोल. कॉर्टिसॉलमुळे आपल्या शरीरात अनेक बदल होतात. ऊर्जा, रोगप्रतिकारक शक्ती आणि ताणतणावाचा सामना करण्याची आपली क्षमता नियंत्रित करण्यासाठी कॉर्टिसोल महत्त्वाचं आहे. तणाव संप्रेरक कॉर्टिसोल का वाढतं? ते नैसर्गिकरित्या कमी कसं करायचं ते समजून घेऊया.
कॉर्टिसॉल, ज्याला सामान्यतः ताण संप्रेरक म्हणून ओळखलं जातं, शरीराची ऊर्जा, रोगप्रतिकारक शक्ती आणि ताणतणावाचा सामना करण्याची क्षमता नियंत्रित करतं. जेव्हा ते बराच काळ जास्त असतं तेव्हा वजन वाढणं, अस्वस्थता, झोपेच्या समस्या आणि इतर अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
advertisement
कॉर्टिसॉल पातळी कमी करण्यासाठी म्हणजेच कॉर्टिसोल डिटॉक्ससाठी कोणताही विशिष्ट आहार किंवा औषधांचा समावेश नाही, तर दैनंदिन जीवनशैलीत बदल केल्यानं हळूहळू ताण कमी होतो आणि शरीर पुन्हा संतुलित राहतं. यामुळे लगेचच फरक दिसतील असं नाही पण दीर्घकाळात मानसिक आणि शारीरिक आरोग्य  यामुळे मजबूत होतं.
आपली जीवनशैली, ज्यात झोप, कॅफीन, मूड, व्यायाम आणि भावनिक स्थिती या सगळ्याचा कॉर्टिसोलवर थेट परिणाम होतो असं NIH च्या अभ्यासातून आढळून आलं आहे. म्हणून, छोट्या सवयी सुधारणं हा नैसर्गिकरित्या कॉर्टिसोल कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
advertisement
जास्त कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स शरीरावर ताण आणू शकतात आणि कोर्टिसोलची पातळी वाढवू शकतात. म्हणून, विशेषतः सकाळनंतर, हे मर्यादित केल्यानं हार्मोनल संतुलन राखण्यास मदत होते.
हास्य हा कोर्टिसोल कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. आप्तांसोबत वेळ घालवणं, हलक्याफुलक्या गप्पा मारणं किंवा काहीतरी मजेदार पाहणं यामुळे मेंदूतून जी रसायनं बाहेर पडतात यामुळे तणाव कमी करायला मदत होते आणि तुमचा मूड त्वरित सुधारतात.
advertisement
ध्यान, खोल श्वास घेणं किंवा काही मिनिटं योगा करणं यासारख्या पद्धतींमुळे मज्जासंस्था शांत होतात. दररोज फक्त दहा ते पंधरा मिनिटं असा सराव केल्यानं कॉर्टिसोल कमी होऊ शकतं आणि भावनिक स्थिरता वाढू शकते असे वैज्ञानिक संशोधनातून दिसून आलं आहे.
नियमित व्यायाम देखील कॉर्टिसोल नियंत्रित करण्यात मोठी भूमिका बजावतो. हलकं चालणं, सायकलिंग, पोहणं किंवा ताकद प्रशिक्षण या सर्व गोष्टी शरीरातील ताण कमी करण्यास मदत करू शकतात. यासोबतच, सात ते आठ तासांची चांगली आणि सतत झोप आवश्यक आहे, कारण कमी झोपेमुळे रात्रभर कॉर्टिसोलचं प्रमाण वाढतं.
advertisement
Psychoneuroendocrinology सारख्या जर्नल्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, सतत ताण कमी करण्याच्या सवयींमुळे कॉर्टिसोल तीस टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. यामुळे हृदयरोग, लठ्ठपणा, टाइप 2 मधुमेह आणि नैराश्याचा धोका देखील कमी होतो. हे साधे बदल दीर्घकाळात मानसिक आणि शारीरिक आरोग्य मजबूत करू शकतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cortisol : कॉर्टिसोल कमी करणं शक्य आहे का ? ताण कमी करण्यासाठी काय करता येईल ?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement