Winter Tips : हिवाळ्यासाठी खास स्किन केअर टिप्स, या पदार्थांमुळे होतं त्वचेचं आतून पोषण
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
थंडीत शरीराचं आतून चांगलं पोषण व्हावं यासाठी गाजर, अक्रोड, आवळा, पालक, अॅव्होकॅडो, बदाम उपयुक्त ठरतात. हिवाळ्यात, बदाम, काजू, सूर्यफुलाच्या बिया आणि चिया सीड्स त्वचेसाठी उत्तम असतात. त्यात व्हिटॅमिन ई, ओमेगा-3 आणि आवश्यक फॅटी अॅसिड असतात, यामुळे त्वचेला आतून पोषण मिळतं. याचे फायदे समजून घेऊयात.
मुंबई : हिवाळ्यात त्वचा कोरडी होते, त्यामुळे मॉईश्चरायझरसारखे पर्याय असतातच पण त्याबरोबर त्वचेला आतून पोषण देण्याचीही गरज असते. यामुळे थंड वातावरणातही त्वचेवरची चमक कायम राहते.
थंडीत शरीराचं आतून चांगलं पोषण व्हावं यासाठी गाजर, अक्रोड, आवळा, पालक, अॅव्होकॅडो, बदाम उपयुक्त ठरतात. याचे फायदे समजून घेऊयात.
गाजर केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे. त्यात बीटा-कॅरोटीन असतं, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. दररोज गाजर खाल्ल्यानं त्वचेला आतून पोषण मिळतं. गाजर सॅलड, ज्यूस किंवा भाज्यांमधे घालू शकता.
advertisement
आवळ्यामधे भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी उपलब्ध असतं. हिवाळ्यात आवळा खाल्ल्यानं त्वचेची चमक वाढते आणि डाग कमी होतात.
आवळ्याचा मुरांबा, लोणचं, चटणी किंवा कच्चाही खाऊ शकता. रिकाम्या पोटी आवळा खाल्ल्यानं त्याचे फायदे वाढतात. त्वचेबरोबरच आवळा केसांसाठी देखील फायदेशीर आहे.
अक्रोड - अक्रोडात ओमेगा-3 फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ई आणि झिंक भरपूर प्रमाणात असतं. हे घटक त्वचेला आतून पोषण देतात आणि ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात. दररोज अक्रोड खाल्ल्यानं तुमची त्वचा खोलवर मॉइश्चरायझ होते आणि कोरडेपणा टाळता येतो. नुसता अक्रोड किंवा स्मूदीमधे किंवा सॅलडमधे खाऊ शकता.
advertisement
पालक - हिवाळ्यात पालक सहज उपलब्ध असतो आणि त्यात लोह, फोलेट, जीवनसत्त्वे अ, के आणि ई सारखे पोषक घटक असतात. हे पोषक घटक निरोगी आणि तरुण त्वचा राखण्यास मदत करतात. पालक तुमच्या आहारात सूप, पराठा किंवा भाजीच्या स्वरूपात समाविष्ट करू शकता.
advertisement
अॅव्होकॅडो - अॅव्होकॅडोमधे हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. यामुळे त्वचा आतून मॉइश्चरायझ होते आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत होते. हिवाळ्यात, अॅव्होकॅडो स्मूदी, सॅलड किंवा ब्रेड स्प्रेड म्हणून खाऊ शकता. अॅव्होकॅडो मॅश करून फेस मास्क म्हणून देखील वापरू शकता.
हिवाळ्यात, बदाम, काजू, सूर्यफुलाच्या बिया आणि चिया सीड्स त्वचेसाठी उत्तम असतात. त्यात व्हिटॅमिन ई, ओमेगा-3 आणि आवश्यक फॅटी अॅसिड असतात, यामुळे त्वचेला आतून पोषण मिळतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 21, 2025 9:08 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Tips : हिवाळ्यासाठी खास स्किन केअर टिप्स, या पदार्थांमुळे होतं त्वचेचं आतून पोषण


