Sleep Routine : सहा तासांपेक्षा कमी झोपता ? वेळीच ओळखा पुढचा धोका, शरीरावर होतात गंभीर परिणाम
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
शरीराला चांगली विश्रांती मिळते तेव्हा शरीर चांगलं काम करु शकंतं, लवकर बरं व्हायला मदत होते आणि जास्त काळ निरोगी राहते. म्हणून, झोपेसाठी वेळ देणं ही तुम्ही स्वतःसाठी करू शकता अशी सर्वात सोपी आणि महत्त्वाची गुंतवणूक आहे.
मुंबई : तुम्ही किती तास झोपता यावर तुमचं आरोग्य अवलंबून असतं. सहा तासांपेक्षा कमी झोपत असाल तर त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. पुरेशी झोप न घेतल्यानं थकवा येतो तसंच शरीरात गंभीर विकार निर्माण होऊ शकतात. या स्थितीमुळे अनेक धोकादायक आजारांचा धोका वाढतो. कमी झोप घेतल्यानं शरीरात काय होतं जाणून घेऊया.
काही कारणांमुळे, रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्यामुळे, कामामुळे किंवा फक्त वेळ घालवण्यासाठी दररोज सहा तासांपेक्षा कमी झोपत असाल, तर ही सवय हळूहळू तुमच्या शरीरात असा त्रास निर्माण करते, ज्याचा परिणाम बराच काळ जाणवतो. सुरुवातीला, केवळ थकवा, चिडचिड किंवा जडत्व जाणवतं, पण खरं नुकसान आधीच सुरू झालेलं असतं.
शरीराचं रिसेट बटन - झोप
advertisement
झोप ही फक्त विश्रांतीसाठीची वेळ नाही, तर शरीराला स्वतःची दुरुस्ती करण्याची, हार्मोन्स संतुलित करण्याची आणि मेंदूतील विषारी पदार्थांना काढून टाकण्याची वेळ आहे. दिवसातून सहा तासांपेक्षा कमी झोपता तेव्हा ही संपूर्ण व्यवस्था बिघडते.
हार्मोनल असंतुलन - झोपेचा अभाव प्रथम अंतःस्रावी प्रणालीवर, म्हणजेच हार्मोनल प्रणालीवर परिणाम करतो. यामुळे तणाव संप्रेरक असलेल्या कॉर्टिसोलची पातळी दीर्घकाळापर्यंत वाढते, ज्यामुळे शरीर सतत सतर्क राहतं. याव्यतिरिक्त, याचा परिणाम चिंता, चिडचिडेपणा, रक्तदाब आणि भूक यावर होतो. दिवसातून सहा तासांपेक्षा कमी झोप घेतल्यानं शरीरातील इन्सुलिन संतुलन बिघडू शकतं, ज्यामुळे कालांतरानं टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो.
advertisement
हृदयावरील भार वाढतो - झोपेच्या कमतरतेचा हृदयावर सर्वात जास्त परिणाम होतो. जे लोक नियमितपणे कमी झोपतात त्यांना उच्च रक्तदाब, हृदयाचे अनियमित ठोके आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. याव्यतिरिक्त, झोपेच्या कमतरतेमुळे रक्तवाहिन्यांमधे सूज वाढते, ज्यामुळे हृदयावर सतत दबाव येतो. एखाद्याला आधीच हृदयरोग असेल तर अपुऱ्या झोपेमुळे त्याचे परिणाम आणखी वाढू शकतात असं संशोधनातून आढळलं आहे..
advertisement
कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती - गाढ झोपेच्या वेळी, शरीर सायटोकिन्स सारखे प्रथिनं तयार करतं, जे संसर्ग आणि जळजळ यांच्याशी लढण्यास मदत करतात. झोप मर्यादित असते तेव्हा या प्रथिनांचं उत्पादन कमी होतं.
याच्या परिणामामुळे वारंवार आजारपण, दुखापती किंवा संसर्गातून बरं होण्यास उशीर होणं. दीर्घकालीन, जुनाट सूज वाढू शकते, लठ्ठपणा, संधिवात आणि चयापचय समस्यांशी ती जोडलेली आहे.
advertisement
स्मरणशक्तीवर परिणाम - कमी झोपेचे परिणाम मेंदूवर लगेच दिसून येतात. फक्त एका रात्रीची कमी झोप लक्ष, प्रतिक्रिया वेळ आणि निर्णय घेण्यावर परिणाम करू शकते. अल्झायमरशी संबंधित बीटा-अॅमायलॉइड प्रथिनसह दीर्घकालीन मेंदूतील कचरा साफ होत नाही. त्यामुळे, सतत कमी झोपेमुळे मेंदूचं वृद्धत्व वाढू शकतं.
मनःस्थिती आणि भूक नियंत्रित करणे कठीण होते. - झोपेच्या अभावामुळे भावनिक संतुलन बिघडतं. चिडचिडेपणा, मूड स्विंग आणि ताण हाताळण्यात अडचण येऊ शकते. भुकेशी संबंधित हार्मोन्स देखील विस्कळीत होतात, ज्यामुळे गोड पदार्थ, तळलेले पदार्थ आणि उच्च-कॅलरीयुक्त पदार्थांची इच्छा निर्माण होते.
advertisement
या कारणास्तव, झोपेचा अभाव हे वजन वाढण्याचं एक प्रमुख कारण असू शकतं.
झोपण्याच्या सवयी कशा सुधारायच्या ?
चांगल्या झोपेसाठी जीवनात मोठे बदल करण्याची आवश्यकता नाही; फक्त काही सोप्या सवयी पुरेशा आहेत:
दररोज झोपण्याची आणि उठण्याची वेळ एकसारखी ठेवा.
advertisement
झोपण्यापूर्वी मोबाईल फोन आणि स्क्रीनचा वापर कमी करा.
मंद प्रकाश, थंड आणि शांत खोलीमुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.
संध्याकाळनंतर कॅफिनचं सेवन मर्यादित करा.
सहा तासांपेक्षा कमी झोप घेतल्यानं शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवावर ताण येतो. आजच्या धावपळीत, लोक अनेकदा झोपेला कमी लेखतात, पण रात्रीची चांगली झोप ही ऊर्जा, आरोग्य आणि दीर्घायुष्य यांचं योग्य संतुलन राखण्याचा सर्वात परिणामकारक मार्ग आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 21, 2025 2:33 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Sleep Routine : सहा तासांपेक्षा कमी झोपता ? वेळीच ओळखा पुढचा धोका, शरीरावर होतात गंभीर परिणाम


