Sholay : ज्या 'बसंती'ने दिली ओळख, तिच्यावरच नाराज होत्या हेमा मालिनी, पण का?

Last Updated:
Hema Malini : हेमा मालिनी यांनी एका मुलाखतीत सांगितलं की 'शोले' या चित्रपटातील बसंतीची भूमिका मिळाल्यानंतर त्या खूप भडकल्या होत्या.
1/7
 'शोले' हा 1975 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट आता 50 वर्षांनी पुन्हा एकदा थिएटर गाजवायला सज्ज आहे. तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या चित्रपटाचा समावेश बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांत होईल असं त्यावेळी कोणाला वाटलं नव्हतं. या चित्रपटात हेमा मालिनी यांनी बसंती हे पात्र साकारलं होतं. बॉलिवूडच्या आयकॉनिक पात्रांमध्ये बसंतीच्या पात्राचा समावेश आहे. पण ही भूमिका मिळाल्यानंतर हेमा मालिनी खूप भडकल्या होत्या.

advertisement
2/7
 हेमा मालिनी यांना 'शोले' चित्रपटातील बसंती हे पात्र छोटं वाटत होतं. एका मुलाखतीत हेमा मालिनी याबाबत म्हणाल्या होत्या,"शोले' या चित्रपटातील बसंती या पात्रासाठी मला विचारणा झाली त्यावेळी मी विचार केला की हे पात्र मी आधी साकारलेल्या 'सीता-गीता' या पात्रापेक्षा दमदार नसेल".

3/7
 हेमा मालिनी म्हणाल्या,"या चित्रपटात अनेक भूमिका आहेत आणि त्यातील एका भूमिकेसाठी मला ऑफर दिल्याचं वाटत होतं. मला एवढा छोटा रोल का ऑफर केलाय अस विचार करत होते".

4/7
 हेमा मालिनी यांना पुढे रमेश सिप्पी यांनी समजावलं की या पात्राला कमी स्क्रीन टाइम असला तरी हेच पात्र या सिनेमाची जान आहे. बसंती हे पात्र लोकांच्या लक्षात राहील आणि तसंच झालं.

5/7
 अॅक्शन सीनबद्दल बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या,"चित्रपटांत माझ्यासाठी खूप अॅक्शन सीन असायचे. शोलेमध्येही अॅक्शन सीन होते. तांगे वाला सीन सगळ्यात कमाल होता. ज्यात बसंती डाकूचा पिछा करते. या सीनसाठी संपूर्ण युनिटने किती मेहनत घेतली होती हे आजही मला चांगलच आठवतंय.

6/7
 'शोले' या चित्रपटात हेमा मालिनीसाठी बॉडी डबलचं काम रेशमा पठानने केलं होतं. हेमा मालिनीसाठी तिने अनेक स्टंट सीन केले. केबीसीच्या सेटवर हेमा मालिनी यांनी स्वत: याबाबत खुलासा केला होता.

7/7
 'शोले' हा बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी चित्रपट आहे. 1975 मध्ये आलेल्या या चित्रपट अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, संजीव कुमार हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. आजही हा सिनेमा आवडीने पाहिला जातो. 'शोले'च्या रि-रिलीजची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement