राज्यातील नेत्यांचा मनसेविरोध कायम, काँग्रेससोबत युतीबाबत ठाकरे आशावादी?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
भाजपला प्रत्युत्तर द्यायचं झाले तर विरोधकांची एकजूट राहणं फार महत्वाचं आहे असं ठाकरेंच्या पक्षाचं म्हणणं आहे.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत मविआ राहाणार की तुटणार हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चीला जातोय. कारण काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष मनसेला सोबत घेण्याच्या विरोधात आहेत. त्यांनी एकला चलोरेचा नारा दिलाय. तर उद्धव ठाकरेंना अजूनही आशा आहे की मार्ग निघेल, तसं झालं नाही तर मात्र हातातून मशाल सुटणार आहे.
मनसेनं परप्रातियांविरोधात घेतलेल्या भूमिकेचा मुद्दा पुढे करत,काँग्रेसनं महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी केलीय. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी मनसेला दूर ठेवण्याची भूमिका घेतली असतानाच उद्धव ठाकरे मात्र काँग्रेसलासोबत घेण्यासाठी सकारात्मक असल्याचं बोललं जातंय. उद्धव ठाकरे दिल्लीतील काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे मविआत फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल. भाजपला प्रत्युत्तर द्यायचं झाले तर विरोधकांची एकजूट राहणं फार महत्वाचं आहे असं ठाकरेंच्या पक्षाचं म्हणणं आहे.
advertisement
ठाकरेंची शिवसेना अशी भूमिका मांडत असले तरी काँग्रेसचे राज्यातील नेते मनसेसोबत जावू नये यावर ठाम आहेत. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मनसेवरून तिढा निर्माण झालाय. दडपशाही करणाऱ्यांसोबत जाणार नाही अशी काँग्रेस नेत्यांनी भूमिका घेतलीय. मनसे नेते आणि काँग्रेस नेत्यांमध्ये खणाखणी सुरूच आहे.
मनसेसोबत युतीबाबत काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी नो म्हटलं असलं तरी शरद पवार मात्र मविआतील फाटाफूट रोखण्याच्या प्रयत्नात आहे.
advertisement
पवारांनी नेमकं काँग्रेसला काय सांगितलं?
मुंबईत एकत्र निवडणूक लढवली पाहिजे
मुंबईत मतविभाजन टाळायला हवं
सत्याच्या मोर्चाप्रमाणे एकत्र मैदानात उतरायला हवं
स्वबळापेक्षा मविआ म्हणून निवडणूक लढावी
मनसेला सोबत घेण्याबाबत एकत्रित चर्चा करावी
एकत्र लढल्यास मतांचा टक्का वाढू शकतो
किमान समान कार्यक्रम तयार करता येतो हे तपासलं पाहिजे
आघाडी केल्यास सर्वच पक्षांना फायदा होईल
advertisement
असं पवारांनी काँग्रेस नेत्यांना सांगितल्याची माहिती मिळत आहे
सत्याचा मोर्चा एकत्रित काढला मग निवडणुकीत वेगळे का लढता?
मविआत मनसे हवी, याबाबत शरद पवार सकारात्मक असल्याची माहिती मिळत असून शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांना फोन केल्याची माहिती मिळत आहे..महाविकास आघाडी म्हणून मुंबई पालिका निवडणूक लढली जावी असं पवारांचं मत आहे. सत्याचा मोर्चा एकत्रित काढला मग निवडणुकीत वेगळे का लढता? असा सवाल पवारांनी केल्याची माहिती मिळत आहे.
advertisement
पालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा
मनसेची मविआतील एन्ट्री काँग्रेसच्या उत्तरभारतीय व्होट बँकेसाठी अडचणीची ठरणार आहे. त्यामुळं काँग्रेसनं पालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा आहे . राज्यातील काँग्रेसचे नेते भलेही एकला चालो रेचा नारा देत असले तरी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे काँग्रेसच्या हायकमांडशी असलेले संबंध यावर मुंबई पालिकेतील आघाडीचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 21, 2025 8:55 PM IST


