Ambarnath: शिवसेना उमेदवाराच्या कारने अनेक वाहनांना उडवलं, 4 जणांचा मृत्यू; घटनेचा LIVE VIDEO

Last Updated:

या अपघातात अंबरनाथ पालिका कर्मचारी शैलेश जाधव, चंद्रकांत अनर्थे यांच्यासह कार चालक आणि आणखी एकाचा मृत्यू झाला आहे

News18
News18
अंबरनाथ : राज्यात सध्या नगरपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. अशातच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या कारने पुलावर अनेकांना चिरडल्याची घटना घडली आहे.  या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक जण जखमी आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथमध्ये संध्याकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शिवसेना शिंदे गटाचे नगर परिषद निवडणुकीचे उमेदवार किरण चौबे यांची ही कार होती. किरण चौबे स्वत: गाडीत होत्या. अंबरनाथ  उड्डाणपुलावरून जात असताना अचानक कारचालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि समोरून येणाऱ्या ३ ते ४ बाईकस्वारांना उडवलं.  या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.
advertisement
या अपघातात अंबरनाथ पालिका कर्मचारी शैलेश जाधव, चंद्रकांत अनर्थे यांच्यासह कार चालक आणि आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात किरण चौबे या सुद्धा जखमी झाल्या आहे. जखमींना तातडीने ल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, पालिकेची इतकी मोठी इमारत पश्चिमेला असताना देखील टाऊन प्लॅनिंग कार्यालय अजूनही पूर्वेलाच आहे, ते कार्यालय बंद करण्यासाठी हे कमी कर्मचारी कार्यालयाात गेले होते. त्यामुळे ठेकेदारांना या कर्मचाऱ्यांचा बळी घेतल्याचा आरोप आता केला जावू लागला आहे.
advertisement
दरम्यान, मृतांना ज्या उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तिथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी भेट दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ambarnath: शिवसेना उमेदवाराच्या कारने अनेक वाहनांना उडवलं, 4 जणांचा मृत्यू; घटनेचा LIVE VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement