Dry Day म्हणजे नक्की काय? हा दिवस नेमका कशासाठी ठेवला जातो? 99 टक्के लोकांना चुकीचा समज
- Published by:Devika Shinde
Last Updated:
purpose of Dry Day : आता प्रश्न असा की खरंच याचा उपयोग होतोय का? आणि ड्राय डेच्या दिवशी प्रत्यक्षात काय होतं? (what is Dry Day) चला, गोष्ट थोडी मजेशीर पद्धतीने पण रिअलिटीसह पाहूया.
ड्राय डे हा असा दिवस आहे, ज्यादिवशी दारूची विक्री आणि सर्व्हिस कायदेशीररीत्या बंद असते. हा दिवस भारतात अनेक राज्यांत पाळले जातात. राष्ट्रीय सण, धार्मिक उत्सव, मतदानाचे दिवस किंवा संवेदनशील कार्यक्रम अशा कारणांसाठी. उदाहरणार्थ प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी), स्वातंत्र्यदिन (15 ऑगस्ट) आणि गांधी जयंती (2 ऑक्टोबर) हे देशभर साधारणतः ड्राय डे असतात. तर निवडणुकीदरम्यान मतदान तसेच निकालाच्या दिवशीही दारुला बंदी असते. हे तर सर्वांना माहित आहे.
advertisement
advertisement
advertisement
सरकारचा उद्देश साधा आहे ते म्हणजे सार्वजनिक शिस्त राखणे, मोठे धार्मिक/राष्ट्रीय कार्यक्रम असताना दारूमुळे गोंधळ, भांडणं, अपघात होऊ नयेत.भावनिक/सांस्कृतिक आदर म्हणजे विशिष्ट दिवसांचा मान राखून, त्या दिवशीचे सार्वजनिक वातावरण 'सोबर' (शांत) ठेवणे.कायदा-सुव्यवस्था सांभाळणे विशेषतः निवडणुका किंवा उत्सवांदरम्यान गर्दी वाढते, तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा धोका कमी होतो.
advertisement
आता हे नियम म्हणून ऐकायला भारी वाटतं किंवा खूप चांगला निर्णय आहे असं वाटतं, पण याचा खरोखर काही फायदा आहे का?तर याचा डायरेक्ट काही फायदा नाही. लोक ड्राय डेच्या आधी स्टॉक भरुन किंवा जमा करुन ठेवतात. अर्थतज्ज्ञ आणि संपादकीय मतंही हाच मुद्दा मांडतात की लोक आधीच साठवणूक करतात, त्यामुळे प्रत्यक्ष सेवनावर “तात्पुरता ब्रेक” इतकाच परिणाम होतो.
advertisement
advertisement
2) काही ठिकाणी ‘अवैध विक्री’चा खेळहे थोडं काळं वास्तव, पण घडतं. ड्राय डेचा दिवस काहींसाठी संधी बनतो, अशावेळी लोक MRP पेक्षा जास्त किंमतीत दारु विकतात. म्हणजे अनावशक साठा वाढतो. अर्थात हे बेकायदेशीर आहे, पण सरकारी बंदी त्यामुळे काही प्रमाणात कायदेशीर व्यवसाय अवैध मार्गाकडे वळतो, अशी टीकाही होत आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


