Mumbai Local News: "एक रूपयाचीही भाडेवाढ न करता लोकल ट्रेन AC करणार", मुख्यमंत्र्यांची मुंबईकरांसाठी मोठी घोषणा

Last Updated:

दरम्यान, मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक रुपयाचीही भाडे वाढ न करता मुंबईकरांना मेट्रोप्रमाणेच लोकलनेही आरामदायक आणि एसीतून प्रवास करता येईल, असं भाष्य केलं आहे.

Mumbai Local News: "एक रूपयाचीही भाडेवाढ न करता लोकल ट्रेन AC करणार", मुख्यमंत्र्यांची मुंबईकरांसाठी मोठी घोषणा
Mumbai Local News: "एक रूपयाचीही भाडेवाढ न करता लोकल ट्रेन AC करणार", मुख्यमंत्र्यांची मुंबईकरांसाठी मोठी घोषणा
लोकल हा मुंबईकरांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. नोकरीला जाण्यासाठी लाखो चाकरमानी लोकलमध्ये धक्के खात, लोकलच्या दरवाजामध्ये लटकत प्रवास करत असतात. लटकत प्रवास करत असताना अनेकदा चाकरमान्यांचे जीवही जातात. त्याचसाठी आता लवकरच मुंबईकरांच्या प्रवासात ऑटोमॅटिक दरवाजे असलेल्या लोकल प्रवासात दाखल होणार आहे. या दरम्यान, एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक रुपयाचीही भाडे वाढ न करता मुंबईकरांना मेट्रोप्रमाणेच लोकलनेही आरामदायक आणि एसीतून प्रवास करता येईल, असं भाष्य केलं आहे.
लाखो मुंबईकर दररोज लोकलच्या दरवाजात लटकून प्रवास करतात. मुंबईकरांचा हा प्रवास फारच जीवघेणा असतो. मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी एसी लोकलबद्दल महत्त्वाचं विधान केलं. "मुंबई उपनगरीय लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. दररोज लोकलने अंदाजे 90 लाख प्रवासी प्रवास करतात. आम्ही लवकरच लोकल सेवेमध्ये महत्त्वाचे बदल करणार आहोत. त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे, आम्ही लोकलचे सर्वच कोचेस मेट्रोसारखे एसी करणार आहोत. शिवाय, त्यांचे दरवाजे सुद्धा ऑटोमॅटिक बंद होणारे असतील. इतकी उत्तम सेवा देत असताना आम्ही सेकंड क्लासचं भाडं वाढवणार नाहीये.", अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमामध्ये दिली.
advertisement
"सध्या मुंबईमध्ये सुरू असलेले विकास कामे 2032 पर्यंत पुर्ण होणार आहेत.", असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. यावर उपाय म्हणून नव्या रस्त्यांचे जाळे उभारले जात आहे. यामध्ये काही बोगदेही तयार करण्यात येत आहेत, मुंबई शहरात न येता एखाद्या व्यक्तीला नवी मुंबई किंवा वसई- विरारपर्यंत कसे पोहोचता येईल हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या विकास कामांअंतर्गत खोदण्यात येत असलेल्या बोगद्यांच्या जाळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'पाताल लोक' म्हणत याबद्दलची सविस्तर माहिती दिली. गर्दीच्या वेळी म्हणदेत पीक अवरला मुंबई शहरात गाड्यांचा वेग हा 20 किलोमीटर प्रति तास इतका असतो, कधी कधी तो 15 पर्यंत खाली येतो. सगळे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा वेग 80 किलोमीटर प्रति तासापर्यंत जाईल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local News: "एक रूपयाचीही भाडेवाढ न करता लोकल ट्रेन AC करणार", मुख्यमंत्र्यांची मुंबईकरांसाठी मोठी घोषणा
Next Article
advertisement
Dharmendra News:  धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून,  हे खास गुपित!
धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित
  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

View All
advertisement