बॉलिवूडमधून मोठी बातमी! 15 वर्षांचा संसार, 2 वेळा ट्विन्स मुलांची आई; फेमस बॉलिवूड अभिनेत्रीचा फॉरेनर नवऱ्याकडून छळ
- Published by:Minal Gurav
Last Updated:
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीपासून दूर आहे. अशातच अभिनेत्रीच्या आयुष्यात मोठं वादळ आलं असून अभिनेत्रीनं नवऱ्याविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
बॉलिवूडमध्ये मागच्या काही महिन्यात अनेक कलाकारांनी डिवोर्स घेतल्याची माहिती समोर आली होती. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं तिच्या नवऱ्याविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्रीनं प्रेमात पडून एका फॉरेनर मुलाशी लग्न केलं होतं. अभिनेत्रीला चार मुलंही झाली. पण लग्नाच्या 15 वर्षांनी अभिनेत्रीला नवऱ्याविरोधात कोर्टाची पायरी चढण्याची वेळ आली आहे.
अभिनेत्री सेलिना जेटली हिनं तिचा नवरा पीटर हाग याच्याविरोधात न्यायालयाचा दरावाजा ठोठावला आहे. सेलिना जेटलीने घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. ऑस्ट्रियन उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिक असलेला पीटर हागला कोर्टाकडून नोटीस जारी केली आहे.
अभिनेत्री सेलिना जेटली गेली अनेक वर्ष बॉलिवूडपासून दूर आहे. तिने तिच्या फॉरेनर नवऱ्याच्या विरोधात मुंबईतील अंधेरी न्यायालयातील फर्स्ट क्लास न्यायिक दंडाधिकाऱ्यांकडे खटला दाखल करण्यात आला आहे. पीटर हाग हा ऑस्ट्रियाचा रहिवासी आहेत. अभिनेत्री सेलिना जेटलीने तिच्या उत्पन्नाच्या स्रोताचं नुकसान आणि मालमत्तेतील तोट्याच्या मोबदल्यात 50 कोटींची नुकसान भरपाई आणि इतर मागण्या केल्या आहेत.
advertisement
पीटर हाग आणि सेलिना जेटली यांनी 2011 मध्ये ऑस्ट्रियामध्ये लग्न केलं होतं. 2012 मध्ये दोघांनी जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यानंतर 2017 मध्ये सेलिना पुन्हा एकदा जुळ्या मुलांची आई झाली. त्यातील एखाचा हाइपोप्लास्टिक हार्टमुळे मृत्यू झाला.
सेलिना जेटली हिनं बॉलिवूडमध्ये अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. ने एन्ट्री, अपना सपना मनी मनी, मीन है तो हनी है, गोलमाल रिटर्न्स आणि थँक्यू सारख्या सिनेमात तिने काम केलं आहे.
advertisement
एकीकडे नवऱ्याकडून छळ तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री तिच्या भावाच्या सुटकेसाठी लढा देतेय. सेलिना जेटलीचा भाऊ रिटायर्ड मेजर विक्रांत कुमार जेटली यांना सप्टेंबर 2024 मध्ये UAE पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव ताब्यात घेतले होते. भावाला भारतात परत आणण्यासाठी सेलिनाने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. अलीकडील सुनावणीत न्यायालयाने परराष्ट्र मंत्रालयाला योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसंच सेलिनाच्या कुटुंबीयांशी आणि UAE अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी एक नोडल अधिकारी नेमण्याचे आदेश दिले आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 25, 2025 2:10 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
बॉलिवूडमधून मोठी बातमी! 15 वर्षांचा संसार, 2 वेळा ट्विन्स मुलांची आई; फेमस बॉलिवूड अभिनेत्रीचा फॉरेनर नवऱ्याकडून छळ


