Smriti Mandhana : स्मृतीच्या लग्नासाठी आलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंनी घेतला मोठा निर्णय, 24 तासात घड्याळाचे काटे फिरले, काय घडलं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Smriti Mandhana Deletes All Wedding Posts : टीम इंडियाच्या खेळाडूंनी म्हणजेच जेमिमा आणि श्रेयंका पाटीलने देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून स्मृतीच्या लग्नाच्या आठवणी पुसून टाकल्या आहेत.
Smriti Mandhana Wedding News : टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना हिचं येत्या 23 तारखेला लग्न होतं. मात्र, लग्नात विघ्न आल्याने लग्न पुढं ढकलण्यात आलं. अशातच आता लग्नातील वऱ्हाडी माघारी परतले आहेत. स्मृतीच्या लग्न सोहळ्याला भारतीय महिला क्रिकेट संघातील जेमिमा रॉड्रिग्स, राधा यादव, शेफाली वर्मा, अरुंधती रेड्डी, शिवाली शिंदे आणि रिचा घोष यांसारख्या अनेक खेळाडू उपस्थित होत्या. त्यानंतर आता टीम इंडियाच्या मोठा निर्णय घेतला आहे.
स्मृतीच्या अकाउंटवरून रील डिलीट
स्मृतीने 'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपटातील समझो हो ही गया, या गाण्यावर आधारित एक मजेशीर रील पोस्ट करत लग्नाची माहिती दिली होती. या व्हिडिओमध्ये जेमिमा रॉड्रिग्ज, श्रेयंका पाटील, राधा यादव आणि अरुंधती रेड्डीही तिच्यासोबत दिसत होत्या. यामध्ये तिने आपली साखरपुड्याची अंगठी दाखवली होती. मात्र आता हा व्हिडिओ तिच्या अकाउंटवर दिसत नाही, तिने डिलीट केला की हाइड, हे अद्याप स्पष्ट झालं नाही.
advertisement
टीम इंडियाच्या खेळाडूंचा मोठा निर्णय
अशातच आता टीम इंडियाच्या खेळाडूंनी देखील मोठा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी म्हणजेच जेमिमा आणि श्रेयंका पाटीलने देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून स्मृतीच्या लग्नाच्या आठवणी पुसून टाकल्या आहेत. त्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले, लग्न मोडलं की काय? असा सवाल आता सोशल मीडियावर विचारला जाऊ लागला आहे.
advertisement
लग्न थांबवण्यात आलंय
दरम्यान, पलाशची बहीण आणि गायिका पलक मुच्छल हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. "स्मृतीच्या वडिलांच्या आरोग्याच्या कारणामुळे पलाश आणि स्मृतीचे लग्न थांबवण्यात आले आहे. या कठीण काळात कुटुंबाच्या खासगीपणाचा मान राखण्याची आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतो.", असं पलाशच्या बहिणीने सोशल मीडियावर लिहिलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 25, 2025 2:21 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : स्मृतीच्या लग्नासाठी आलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंनी घेतला मोठा निर्णय, 24 तासात घड्याळाचे काटे फिरले, काय घडलं?


