काही घटक केसांच्या वाढीला गती देण्यास मदत करू शकतात. कोरफड हे केसांसाठीचं नैसर्गिक औषध. याआधीही तुम्ही कोरफडीचा वापर केला असेल पण आताची माहिती त्यात आणखी भर घालणारी आहे.
कोरफडीबरोबर आणि मेथीचं तेल हे समीकरण केस वेगानं वाढण्यास मदत करतं. या उपायामुळे केस जाड आणि काळे राहतात. इंस्टाग्रामवरील एका पोस्टमधे घरी कोरफड आणि मेथीचं तेल तयार करण्याची एक सोपी पद्धत सांगितली आहे.
advertisement
Lifestyle Tips : दीर्घ आयुष्याचं जपानी सीक्रेट, या दहा सवयी वाढवतील तुमचं आयुष्य
यासाठी दोन किंवा तीन कोरफडीची मोठी पानं घ्या आणि ती पूर्णपणे स्वच्छ करा. ही पानं अर्धी करा, टोकं चिकटून ठेवा. कापलेल्या भागांत मेथीचे दाणे ठेवा आणि त्यांना दोरीनं बांधा. ही पानं तीन ते चार दिवस तशीच राहू द्या. मेथीचे दाणे फुटले की ते काढून टाका. आता कोरफडीची पानं चिरून घ्या.
कोरफडीचे तुकडे, मेथीचे दाणे, काही लवंगा आणि चिरलेले कांदे नारळाच्या तेलात घाला आणि त्यांचा रंग बदलेपर्यंत उकळवा. मिश्रण थंड करा आणि मिक्सरमधे फिरवा. मिश्रण गाळून घ्या. कोरफड आणि मेथीचे केसांचे तेल तयार आहे.
Sleep Routine : अपुऱ्या झोपेचे परिणाम, शरीर - मनाला जाणवतो थकवा, जाणून घ्या स्लीप रुटिन टिप्स
कोरफड आणि मेथीमधील पोषक तत्व केसांना मजबूत आणि दाट करतात, तसंच केसांच्या समस्या देखील दूर करतात. मेथी आणि कोरफडमधील जीवनसत्त्वं ई, के आणि फोलेट केसांना जाड बनवतात आणि मुळं मजबूत करतात. मेथीमध्ये फायटोएस्ट्रोजेन असतात, यामुळे केसांचं नुकसान टाळण्यास मदत करतात. कोरफड खाज सुटणाऱ्या टाळूला आराम देते आणि निरोगी टाळू डोक्यातील कोंडा कमी करण्यास मदत करू शकते.