उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील हेअर ट्रान्सप्लांटचं हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. अनुष्का तिवारी नावाची ही महिला. जिच्याकडे एमबीबीएसची डिग्री, फक्त बीडीएस म्हणजे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी पास आहे. ती स्वतःला डर्मेटोलॉजिस्ट सांगून हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी करत होती. तिच्याकडे कुणी ट्रेन असिस्टंटही नव्हता. तिने केलेल्या हेअर ट्रान्सप्लांटमुळे 2 मृत्यू झाल्यानंतर ती फरार झाली आहे.
advertisement
हेअर ट्रान्सप्लांटमुळे दोघांचा मृत्यू
रावतपूर पोलीस स्टेशन परिसरातील ऑफिसर कॉलनीत राहणारा विनीत विनीत दुबे. जो मूळचा गोरखपूरचा. पंकी पॉवर प्लांटमध्ये तो असिस्टंट इंजिनीअर होता. त्याचं लग्न झालं होतं, त्याला दोन मुलं आहेत. विनीत 13 मार्च रोजी केस प्रत्यारोपणासाठी एम्पायर वाराही क्लिनिकच्या अनुष्का तिवारीकडे गेला. महिला डॉक्टरने त्याला इंजेक्शन देताच त्याचा चेहरा सुजला. त्याची प्रकृती बिघडू लागली. त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं.
आधी होतं टक्कल, नंतर डोक्यावर केस आले आणि नोकरीच गेली, प्रकरण काय?
पत्नी जयाने सांगितलं की, तिला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला आणि विनीतच्या चेहऱ्यावर सूज आली असून त्याला रुग्णालयात दाखल करत असल्याचं सांगितलं. नंतर फोन कट झाला. तिने त्या नंबरवर पुन्हा फोन केला तर फोन स्विच ऑफ होता. तिने हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या डॉक्टरला फोन लावला. तिचाही फोन स्विच ऑफ. त्यानंतर तिने कानपूरमध्ये राहणाऱ्या तिच्या नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये जाऊन विनीतबाबत माहिती घ्यायला सांगितलं. उपचारादरम्यान त्याची प्रकृती बिघडू लागल्यावर त्याच्या कुटुंबियांनी त्यांना रिजन्सी रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान 14 मार्च रोजी त्याचं निधन झालं.
त्याआधी 18 नोव्हेंबर रोजी फतेहगडचा रहिवासी असलेला मयंक कटियारही डॉ. अनुष्का तिवारीकडे गेला होता. दुपारी 2 वाजताच्या सुमारास त्याला क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला. तोपर्यंत कोणालाही कल्पना नव्हती की ही प्रक्रिया मयंकच्या आयुष्यातील शेवटची ठरेल. संध्याकाळी मयंकला त्याचा धाकटा भाऊ कुशाग्र घरी घेऊन आला. पण रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मयंकला तीव्र वेदना जाणवू लागल्या. डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला. जेव्हा वेदना कमी होत नव्हत्या तेव्हा मला पट्टी सोडण्यास सांगण्यात आले. पण मयंकचा त्रास कमी झाला नाही. मयंक रात्रभर वेदनेने कण्हत राहिला. त्याचा चेहरा सुजला आणि काळवंडला.
लाखात असं एक असतं! मुंबईत जन्माला आलं विचित्र बाळ, आई तर आई डॉक्टरही धक्क्यात
सकाळी पुन्हा डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की सर्व काही सामान्य आहे आणि सर्व काही ठीक होईल याची खात्री देत राहिले. जेव्हा प्रकृती बिघडली तेव्हा डॉक्टरांनी मयंकला फारुखाबादमधील हृदयरोगतज्ज्ञांकडे पाठवलं, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही हृदयाची समस्या नाही. 19 नोव्हेंबर रोजी सकाळी, कुटुंब त्याला कानपूरला परत घेऊन जाण्याच्या तयारीत असताना मयंकचा त्याच्या आईच्या कुशीत मृत्यू झाला.
केस प्रत्यारोपण म्हणजे काय?
जर तुमच्या डोक्यावरील केस गळले असतील आणि तुम्हाला टक्कल दिसू लागले असेल, तर तुम्ही हेअर ट्रान्सप्लांटद्वारे टक्कल पडलेल्या ठिकाणी पुन्हा केस लावू शकता. केस प्रत्यारोपण ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये प्लास्टिक सर्जन किंवा त्वचाविज्ञान सर्जन डोक्याच्या टक्कल असलेल्या भागावर केसांचे प्रत्यारोपण करतात. यासाठी तज्ज्ञ सहसा डोक्याच्या मागच्या बाजूचे किंवा दोन्ही बाजूचे केस काढून टाकतात. केस प्रत्यारोपणापूर्वी रुग्णाला वेदना होऊ नये म्हणून भूलही दिली जाते.