आधी होतं टक्कल, नंतर डोक्यावर केस आले आणि नोकरीच गेली, प्रकरण काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Hair Transplant : हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या एका व्यक्तीची अवस्था अशी झाली की त्याला त्याची नोकरी गमवावी लागली आणि लोकांना तोंड दाखवणं कठीण झालं आहे.
नवी दिल्ली : वाढत्या वयामुळे केस गळणे आणि टक्कल पडणं ही पुरुषांसाठी एक मोठी समस्या बनते. ही समस्या अनेक लोकांच्या व्यवसायातही अडथळा बनते. म्हणूनच बरेच लोक हेअर ट्रान्सप्लांटसारख्या उपचारांचा पर्याय निवडतात. या प्रकारचे उपचार देणाऱ्या अनेक कंपन्या ते सुरक्षित आणि प्रभावी असल्याचा दावा करतात, परंतु एका पुरूषाच्या बाबतीत असं नव्हतं. त्याने केस प्रत्यारोपण केलं आणि त्याने नोकरीच गमावली.
57 वर्षीय मार्क स्वीनीचं आयुष्य हेअर ट्रान्सप्लांटनंतर एका दुःस्वप्नात बदललं. त्याने यूकेमधील ग्लासगो सिटी सेंटरमधील मर्चंट सिटी मेडिकल सेंटरमध्ये हेअर ट्रान्सप्लांट केलं. यासाठी त्याने तब्बल 4 लाख रुपये मोजले. पण पण शस्त्रक्रिया काही यशस्वी झाली नाही. आणि मार्कच्या कपाळावर एक मोठा डाग राहिला.
advertisement
त्याच्या कपाळाच्या डाव्या बाजूला एक डाग आहे आणि डोक्याच्या मध्यभागी एक पॅच आहे कारण उपचारांमध्ये त्याच्या डोक्याच्या मध्यभागी असलेले काही केस काढून ते त्याच्या कपाळाच्या अगदी वर ठेवण्यात आले होते. आता मार्कला त्याची हेअर लाइन शेव्ह करावी लागली आणि डाग लपवण्यासाठी त्याला त्याचे काही केस वाढवले. तो केसांनी डाग झाकून घेतो.
advertisement
हा डाग इतका मोठा होता की त्याला कुणाला तोंडही दाखवावंसं वाटत नव्हतं. त्यामुळे त्याला ग्लासगोमधील बटरी रेस्टॉरंटमधील वेटरची नोकरीही सोडावी लागली. हेअर ट्रान्सप्लांटनंतर मार्क चिंता आणि नैराश्याशी झुंजत आहे कारण त्याची स्वतःची प्रतिमा लक्षणीयरीत्या खराब झाली आहे. आता तो त्यातून बरा होण्यासाठी औषधं घेत आहे.
केस प्रत्यारोपण म्हणजे काय?
जर तुमच्या डोक्यावरील केस गळले असतील आणि तुम्हाला टक्कल दिसू लागले असेल, तर तुम्ही हेअर ट्रान्सप्लांटद्वारे टक्कल पडलेल्या ठिकाणी पुन्हा केस लावू शकता. केस प्रत्यारोपण ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये प्लास्टिक सर्जन किंवा त्वचाविज्ञान सर्जन डोक्याच्या टक्कल असलेल्या भागावर केसांचे प्रत्यारोपण करतात. यासाठी तज्ज्ञ सहसा डोक्याच्या मागच्या बाजूचे किंवा दोन्ही बाजूचे केस काढून टाकतात. केस प्रत्यारोपणापूर्वी रुग्णाला वेदना होऊ नये म्हणून भूलही दिली जाते.
advertisement
केस प्रत्यारोपणाचे अनेक प्रकार आहेत. परंतु, त्याच्या दोन पद्धती सर्वात लोकप्रिय आहेत आणि बहुतेक लोक त्यांचा प्रत्यारोपणासाठी वापर करतात. पहिली पद्धत म्हणजे फॉलिक्युलर युनिट ट्रान्सप्लांटेशन आणि दुसरी पद्धत म्हणजे फॉलिक्युलर युनिट एक्सट्रॅक्शन. या दोन्ही पद्धतींनी लावलेले केस नैसर्गिक दिसतात आणि तुम्ही ते कापून डायही करू शकता.
Location :
Delhi
First Published :
March 11, 2025 12:59 PM IST