आयुर्वेदानुसार, सर्व आजारांचं मूळ आपल्या खराब पचनसंस्थेत आहे. अन्न व्यवस्थित पचत नाही त्यामुळे पोटात गॅस, आम्ल आणि जडपणा येऊ शकतो. पचन व्यवस्थेसाठी काही नैसर्गिक उपाय प्रभावी ठरू शकतात. ओवा आणि जिरं हे घराघरात वापरले जाणारे मसाले. यातल्या औषधी गुणधर्मांमुळे पचनाच्या समस्या कमी होऊ शकतात.
ओव्यातील थायमॉल हा घटक पोटातील पाचक रसांना उत्तेजित करतो, तर जिऱ्यामुळे चयापचय वाढून शरीराला आतून शुद्ध करायला मदत होते.
advertisement
Yogasana : खास महिलांसाठी हेल्थ टिप्स, योगासनं करा, ठणठणीत राहा
पर्शियन-फॅक्ट अभ्यास 2024नुसार, आतड्यांसंबंधी अपचन असलेल्या रुग्णांवर ओवा आणि बडीशेप देण्यात आली. दोन आठवड्यांनंतर चाचणी करण्यात आली. अपचन आणि जेवणानंतर अस्वस्थ वाटणं कमी झाल्याचं या चाचणीत आढळून आलं.
ओवा आणि बडीशेप इतर औषधी वनस्पतींमधे मिसळून तयार केलेल्या पावडरमुळे लॅक्टिक ॲसिडिटी आणि गॅसपासून आराम मिळतो.
आतड्यांसंबंधी समस्या ज्यांना जाणवते त्यांच्यासाठी झोपण्यापूर्वी ओवा आणि बडीशेपेचं पाणी पिणं खूप उपयुक्त ठरू शकतं. रात्री झोपण्यापूर्वी या दोन्ही घटकांसह कोमट पाणी प्यायलं तर ते रात्रभर तुमच्या पचनसंस्थेवर काम करतं आणि सकाळी कोणत्याही समस्येशिवाय नैसर्गिकरित्या पोट स्वच्छ करण्यास मदत होते.
या उपायामुळे, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकले जातात. यामुळे त्वचेवर आणि उर्जेवर देखील सकारात्मक परिणाम जाणवतो.
महागड्या औषधांऐवजी, घरी सहज उपलब्ध असलेल्या या दोन गोष्टींमुळे पोटाच्या समस्यांपासून कायमची सुटका मिळवू शकता.
Skin Care : त्वचेसाठी टरबुजाच्या बिया सुपरफूड, जाणून घ्या बियांचे फायदे
पचनसंस्था - ओव्यात आढळणाऱ्या थायमॉल घटकामुळे पोटात पाचक रसांचं उत्पादन वाढतं. यामुळे जड अन्न पचवणं सोपं होतं आणि अन्नाचं उर्जेत जलद रूपांतर होतं. जेवणानंतर पोट जड होण्याची समस्या असलेल्यांसाठी ओवा आणि जिऱ्याचं पाणी एक नैसर्गिक टॉनिक म्हणून काम करतं.
गॅस आणि अॅसिडिटीपासून त्वरित आराम - पोट फुगणं आणि पित्त कमी करण्यासाठी जिरं फायदेशीर मानलं जातं. या मिश्रणामुळे आतड्यांमधे अडकलेला वायू बाहेर काढण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी हे पाणी प्यायल्यानं पोटदुखीपासून आराम मिळतो आणि वारंवार अॅसिडिटीची समस्या कमी होते.
