थंडीच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहावी यासाठी आवळा आणि हळदीचा रस हा एक उत्तम पर्याय आहे. शतकानुशतकं, आयुर्वेदात आवळा आणि हळदीच्या औषधी गुणधर्मांचं महत्त्व सांगितलं गेलंय. यामुळे शरीराची अंतर्गत मजबुती आणि अनेक हंगामी आजारांपासून संरक्षण शक्य होतं.
Vitamin D : 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरता ठरु शकते हानिकारक, लक्षणं ओळखा, उपचार घ्या
advertisement
हा रस बनवणं सहज शक्य आहे, जाणून घेऊया कृती आणि उपयुक्तता -
तयार करण्याची पद्धत - प्रथम, आवळ्यातील बिया काढून टाका आणि आवळ्याचे तुकडे करा. आता अर्धा चमचा हळद किंवा एक इंच कच्ची हळद आणि एक चतुर्थांश कप पाणी घालून मिक्सरमधे बारीक करा. रस गाळून घ्या, त्यात चिमूटभर काळी मिरी पावडर घाला आणि चवीनुसार लिंबाचा रस आणि मध घाला. सकाळी रिकाम्या पोटी प्या. आठवड्यातून तीन-चार वेळा हा रस घेतल्यानं हिवाळ्यात तुम्ही निरोगी, उत्साही राहू शकाल.
रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त - आवळा हा व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे, यामुळे पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढवून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग होतो. हळदीतील करक्यूमिन बॅक्टेरिया आणि विषाणूंशी लढण्यास मदत करते.
पचन सुधारतं - या रसामुळे पचनक्रिया सुधारते. आवळा आम्लता आणि वायू कमी करतो, तर हळद आतड्यांतील जळजळ कमी करते.
त्वचा चमकदार राहते - या रसातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेतील विषारी पदार्थ बाहेर काढतात, ज्यामुळे ती स्वच्छ आणि चमकदार होते.
Winter Care : पायांच्या भेगांवर हा उपाय करुन बघा, पाच मिनिटात बनवा जेली
सर्दी आणि खोकल्यापासून आराम - हळद आणि आवळा या दोन्हीत अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत, घसा खवखवणं, खोकला आणि सर्दी यापासून आराम देतात.
यकृतासाठी उपयुक्त - या रसामुळे यकृताच्या स्वच्छता होते आणि त्याचं कार्य सुधारतो. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतो.
मधुमेहासाठी फायदेशीर - आवळा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो आणि हळद इन्सुलिन संवेदनशीलता देखील वाढवते.
केसांसाठी फायदेशीर - आवळा मुळांना पोषण देतो आणि केस गळती थांबवतो, तर हळद टाळूला निरोगी ठेवते.
