पोटदुखी, गॅस, मायग्रेन आणि कावीळ यावर हिंग फायदेशीर आहे. हिंगाच्या वापरानं अन्न लवकर पचतं आणि पोटाची सूज कमी होते. याशिवाय सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या आजारांमध्येही ते फायदेशीर आहे. छोटी हिंगाची डबी हे आजीच्या काळापासूनचं औषध आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे.
हिंग हा नैसर्गिक घटक अन्नाची चव वाढवण्याबरोबरच अनेक आजार बरे करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. हिंगामधले अनेक औषधी गुणधर्म अपचन, गॅस आणि पोटदुखी यासारख्या पोटाशी संबंधित समस्यांमध्ये आराम देतात.
advertisement
हिंगाच्या वापरानं अन्न लवकर पचतं आणि पोटाची सूज कमी होते. याशिवाय सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या आजारांमध्येही ते फायदेशीर आहे. हिंगाच्या वनस्पतीचं नाव फेरुला हिंग आहे. हिंग, हिंगार, कायम, यांग, हेंगू, इंगुवा, हिंगु, अगुडगंधू आणि रामाहा अशा अनेक नावांनी हिंग ओळखलं जातं. त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यांचं वर्णन आयुर्वेदात केलेलं आहे.
High BP : WHO नं सांगितलेल्या टिप्स नक्की वाचा, BP नियंत्रणात ठेवणं होईल सोपं
हिंगाचे फायदे
1. पचनाच्या समस्यांवर गुणकारी
अपचन, पोटदुखी, मळमळ, दातदुखी, सर्दी, खोकला आणि सर्दीमुळे होणारी डोकेदुखी यापासून हिंगामुळे आराम मिळतो. याशिवाय, विंचू किंवा किडा चावल्यानं होणारी जळजळही हिंगामुळे कमी होते. पोट अचानक दुखत असेल तर पाण्यात थोडं हिंग विरघळवून घ्या, पाणी थोडं गरम करा आणि नाभी आणि आजूबाजूच्या भागावर लावा. असं केल्यानं पोटदुखीपासून त्वरित आराम मिळतो. हिंगाचं पाणी नाभीभोवती गोलाकार पद्धतीनं लावल्यानं पोट फुगणं, पोट जड होणं आणि गॅसची समस्या दूर होते.
2. वेदनाशामक म्हणून उपयोगी
हिंगाचा वापर अनेक प्रकारच्या वेदना आणि आजार बरे करण्यासाठी फायदेशीर आहे. दातदुखीच्या बाबतीत, कापूर हिंगामध्ये मिसळून दुखणाऱ्या भागावर लावल्यानं आराम मिळतो. कानदुखी कमी करण्यासाठी, तिळाच्या तेलात हिंग उकळा आणि त्या तेलाचे काही थेंब कानात टाकल्यानं वेदना कमी होतात.
3. काविळीवरच्या उपचारात हिंग फायदेशीर
काविळीवरच्या उपचारात, हिंग सुक्या अंजीरासोबत खावं आणि कावीळमध्ये, हिंग पाण्यात टाकून डोळ्यांवर लावल्यानं फायदा होतो. दररोज डाळ आणि भाज्यांमध्ये हिंग घातल्यानं अन्नाचं पचन सोपं होतं. हिंग शरीरात इन्सुलिन वाढवून रक्तातील साखर कमी करतं.
Fatty Liver : यकृताची काळजी घ्या, लिव्हर फॅटी होऊ नये यासाठी खास टिप्स
4. रक्त पातळ करण्यासाठी उपयुक्त
हिंगामधे असलेला कौमरिन हा घटक रक्त पातळ करण्यासाठी उपयुक्त आहे. वाढलेले ट्रायग्लिसराइड्स आणि कोलेस्टेरॉल कमी करणं तसंच उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठीही हिंग उपयोगी आहे.
5. पोटातील वायू, रक्तदाबात फायदेशीर
ताकासोबत किंवा अन्नासोबत हिंग खाल्ल्यानं पोटातील वायू, कॉलरा आणि पोटदुखीपासून आराम मिळतो. हिंगामध्ये इतकी शक्ती असते की ते कर्करोग निर्माण करणाऱ्या पेशींना रोखते. हिंग आणि मीठ मिसळून पाण्यासोबत घेतल्यानं रक्तदाब नियंत्रणासाठी फायदा होतो.
6. प्रसूतीनंतर फायदेशीर
प्रसूतीनंतर हिंगाचा वापर केल्यानं गर्भाशय स्वच्छ होतं आणि पोटाच्या समस्या टाळता येतात. मायग्रेन आणि डोकेदुखी कमी करण्यासाठी अर्धा कप पाण्यात हिंग मिसळून प्यायल्यानं आराम मिळतो.
