TRENDING:

Fennel Water : रात्री झोपण्याआधी बडीशेपेचं पाणी पिण्याचे फायदे, आजारांपासून संरक्षण करणारं हेल्थ ड्रिंक

Last Updated:

बडीशेप ही एक साधी आणि शक्तिशाली औषधी वनस्पती, चव तर वाढवतेच आणि आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर ठरू शकते. बडीशेप खाण्यानं पचन सुधारतं. तसंच रात्री झोपण्यापूर्वी बडीशेपेचं पाणी प्यायल्यानं हे फायदे दुप्पट होऊ शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : प्रकृतीत काही बदल झाले, तब्येत बरी नसली तर आधी घरातल्या उपायांकडे लक्ष वळतं. या घरगुती उपायांमधे बहुतेकदा वापरले जातात विविध मसाले. जीरं, ओवा, दालचिनी याचा उपयोग तर होतोच शिवाय, आणखी काही घरगुती उपायांविषयी जाणून घेऊयात.
News18
News18
advertisement

आपल्या रोजच्या वापरातल्या जिन्नसांमधे असते बडीशेप. आरोग्याच्या अनेक समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी बडीशेप उपयुक्त आहे. बडीशेप ही एक साधी आणि शक्तिशाली औषधी वनस्पती, चव तर वाढवतेच आणि आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर ठरू शकते. बडीशेप खाण्यानं पचन सुधारतं. तसंच रात्री झोपण्यापूर्वी बडीशेपेचं पाणी प्यायल्यानं हे फायदे दुप्पट होऊ शकतात.

Weight Reduction : वजन कमी करण्यासाठी आठ व्यायामांचा सेट, एका महिन्यात दिसेल फरक

advertisement

पोटासाठी फायदेशीर - झोपण्यापूर्वी बडीशेपेचं पाणी प्यायल्यानं पचन सुधारतं आणि गॅस, अपचन, पोटफुगी आणि आम्लता यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. बडीशेपेच्या पाण्यात असलेलं फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स आतडी स्वच्छ करण्यास देखील मदत करू शकतात.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त - बडीशेपेचं पाणी प्यायल्यानं चयापचय गतिमान होतं आणि शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी जाळली जाते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. लठ्ठपणामुळे त्रासला असाल आणि वजन कमी करू इच्छित असाल तर बडीशेपेचं पाणी आरोग्यदायी पेय म्हणून काम करू शकतं.

advertisement

Oily Hair : केस चिकट होण्यामागे आहे हे कारण, बाह्य कारणांबरोबर अंतर्गत घटकांचाही करा विचार

हृदयासाठी निरोगी: बडीशेपेत पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी याची मदत होते. झोपण्यापूर्वी बडीशेपेचं पाणी प्यायल्यानं हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो. हे पाणी नियमितपणे प्यायल्यानं हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

डिटॉक्स: बडीशेपेचं पाणी रात्री प्यायल्यानं शरीरात साचलेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. पाणी यकृत स्वच्छ ठेवण्यास मदत करतं तसंच त्वचेशी संबंधित समस्याही यामुळे कमी करण्यास मदत होते.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Fennel Water : रात्री झोपण्याआधी बडीशेपेचं पाणी पिण्याचे फायदे, आजारांपासून संरक्षण करणारं हेल्थ ड्रिंक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल