Oily Hair : केस चिकट होण्यामागे आहे हे कारण, बाह्य कारणांबरोबर अंतर्गत घटकांचाही करा विचार

Last Updated:

केस वारंवार धुतल्यानंतरही तेलकट राहिले तर हे केवळ बाह्य प्रदूषणामुळे होत नाही, तर शरीरातील विशिष्ट जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे आणि हार्मोनल असंतुलनामुळे देखील होऊ शकतं.

News18
News18
मुंबई : केस निरोगी आणि चमकदार राहावेत असं प्रत्येकाला वाटतं. अनेकदा, केस दररोज धुतले तरी केस नेहमीच तेलकट आणि चिकट दिसतात अशी तक्रार अनेकांची असते. धूळ, प्रदूषण, जास्त शॅम्पू करणं इत्यादी बाह्य घटकांमुळे हे होऊ शकतं.
केस चिकट होत असतील तर बाह्य गोष्टींप्रमाणेच अंतर्गत पोषण देखील एक घटक असू शकतो. आहारतज्ज्ञ सुमन अग्रवाल यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. केस वारंवार धुतल्यानंतरही तेलकट राहिले तर हे केवळ बाह्य प्रदूषणामुळे होत नाही, तर शरीरातील विशिष्ट जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे आणि हार्मोनल असंतुलनामुळे देखील होऊ शकतं.
advertisement
केस चिकट का होतात -
आहारतज्ज्ञांच्या मते, हे व्हिटॅमिन बी5 (पॅन्टोथेनिक एसिड) च्या कमतरतेमुळे असू शकतं. हे जीवनसत्व शरीरातील सेबम उत्पादन संतुलित करतं. गर्भधारणा, रजोनिवृत्ती किंवा तारुण्यातल्या हार्मोनल बदलांमुळे देखील टाळू तेलकट होऊ शकतो.
व्हिटॅमिन बी5 च्या कमतरतेवर मात करण्यासाठी, आहारात एवोकॅडो, रताळं, सूर्यफुलाच्या बिया आणि संपूर्ण धान्य हे घटक असणं गरजेचं आहे.
advertisement
केस पातळ होणं - केस अचानक पातळ होऊ लागले तर ते बायोटिनच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. बायोटिनमुळे केस मजबूत होतात आणि यामुळे केसांच्या वाढीला प्रोत्साहन मिळतं. यासाठी बदाम, अंडी आणि रताळं खाऊ शकता.
टाळूला खाज सुटणं आणि डोक्यातील कोंडा - सतत खाज सुटणं किंवा कोंडा होणं हे झिंक आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेशी निगडीत असू शकतं. टाळूच्या आरोग्यासाठी झिंक आवश्यक आहे आणि व्हिटॅमिन डी मुळे केसांच्या वाढीला मदत होते. यासाठी आहारात भोपळ्याच्या बिया, काजू आणि पांढरे चणे समाविष्ट करू शकता.
advertisement
कोरडे आणि खडबडीत केस -  केस खूप कोरडे असतील तर ते व्हिटॅमिन ए आणि ओमेगा-३ फॅटी एसिडच्या कमतरतेमुळे असू शकतं. ओमेगा-3 मुळे केसांना नैसर्गिक ओलावा मिळतो, तर व्हिटॅमिन ए मुळे टाळू निरोगी राहतो. यासाठी आहारात जवस, बदाम, पालक आणि गाजर यांचा समावेश करा. तसेच, वारंवार उष्ण उपकरणांनी केसांचं स्टायलिंग टाळा.
advertisement
केस गळणं - जास्त केस गळणं हे प्रथिनं आणि लोहाच्या कमतरतेशी निगडित आहे. प्रथिनं केसांची मूलभूत रचना बनवतात, तर लोह रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा सुधारते, ज्यामुळे केसांची मुळं मजबूत राहतात. या कमतरतेमुळे केस गळण्याचं प्रमाण वाढू शकतं. हे कमी करण्यासाठी, आहारात चिकन, अंडी, मसूर, पनीर, पालक, चणे आणि राजमा यांचा समावेश करा.
advertisement
केसांचं आरोग्य केवळ चांगला शाम्पू किंवा तेलावर अवलंबून नाही तर आहारावरही अवलंबून असतं. केस दीर्घकाळ निरोगी आणि सुंदर राखायचे असतील तर आहारात जीवनसत्त्वं आणि खनिजांचं संतुलन असणं महत्त्वाचं आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Oily Hair : केस चिकट होण्यामागे आहे हे कारण, बाह्य कारणांबरोबर अंतर्गत घटकांचाही करा विचार
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement