Nails : नखांचा रंग तपासा, शरीराचे संकेत ओळखा, नखांना का म्हणतात शरीराचा आरसा ?

Last Updated:

सामान्यत: नखं हलक्या गुलाबी रंगाची असतात, शरीरातलं रक्ताभिसरण आणि संतुलित जीवनशैलीचे ते संकेत आहेत. पण नखं पिवळी, पांढरी, निळी किंवा हिरवी होऊ लागली तर ती केवळ आरोग्याचा इशाराच नाही तर तुमच्या दैनंदिन सवयींचंही प्रतिबिंब असू शकतं. यासाठी पाहूया रंगांमुळे शरीरातले अपडेट कसे ओळखायचे.

News18
News18
मुंबई : दररोज आरशात आपला चेहरा, केसांकडे आवर्जून लक्ष दिलं जातं, पण आपण अनेकदा नखांकडे दुर्लक्ष होतं. नखं ही आपल्या जीवनशैलीचं प्रतिबिंब असतात. जाणून घेऊया नखांच्या रंगात कसं दडलंय आरोग्याचं गुपित.
आहार, झोप, ताणतणाव आणि दैनंदिन सवयी यांचा नखांवर थेट परिणाम होतो. नखांचा रंग किंवा पोत थोडासा बदलतो. या रंगांवरुन तुम्हाला दिनचर्येत काही बदल करण्याची आवश्यकता आहे का ते कळतं.
सामान्यत: नखं हलक्या गुलाबी रंगाची असतात, शरीरातलं रक्ताभिसरण आणि संतुलित जीवनशैलीचे ते संकेत आहेत. पण नखं पिवळी, पांढरी, निळी किंवा हिरवी होऊ लागली तर ती केवळ आरोग्याचा इशाराच नाही तर तुमच्या दैनंदिन सवयींचंही प्रतिबिंब असू शकतं. यासाठी पाहूया रंगांमुळे शरीरातले अपडेट कसे ओळखायचे.
advertisement
उदाहरणार्थ, लांबलचक पिवळी नखं हे बुरशीजन्य संसर्गाचं किंवा चुकीच्या आहाराचं लक्षण असू शकतं. पांढरी नखं यकृताच्या समस्या किंवा हायड्रेशनच्या समस्या दर्शवणारे संकेत असू शकतात.
निळी किंवा थोडी जांभळी नखं शरीरात रक्तप्रवाह योग्यरित्या होत नसल्याचं दर्शवतात, यामुळे कदाचित तुम्हाला व्यायाम आणि संतुलित आहाराकडे लक्ष देण्याची आवश्यकता असू शकेल.
advertisement
नखांची नियमित तपासणी आणि निरोगी आहारामुळे जीवनशैली सुधारण्यास मदत होऊ शकते. दूध, दही, चीज, हिरव्या भाज्या, धान्य, कडधान्यं आणि काजू हे सर्व अन्नघटक नखं मजबूत आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात.
advertisement
याव्यतिरिक्त, झोप आणि ताण व्यवस्थापन जर योग्य प्रमाणात नसेल तर नखांच्या आरोग्यावर परिणाम दिसून येतो. ताण कमी करणं, पुरेसं पाणी पिणं आणि संतुलित आहार घेणं यासारखे जीवनशैलीतले छोटे बदल नखं निरोगी राहण्यास उपयुक्त ठरु शकतात.
नखांचा रंग थोडासा बदलणं किंवा नखांचा पोत बदलणं हे संकेत असतात, ही गंभीर समस्या नाही. पण एक  नक्की की त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि नियमितपणे स्वतःचं निरीक्षण करा. जेणेकरुन शरीरात काय सुरु आहे याचा अंदाज घेऊन तुम्हाला दिनचर्येत आवश्यक बदल करता येतील.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Nails : नखांचा रंग तपासा, शरीराचे संकेत ओळखा, नखांना का म्हणतात शरीराचा आरसा ?
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement