World Heart Day : हृदय निरोगी ठेवण्यासाठी या टिप्स लक्षात ठेवा, जागतिक हृदय दिनी समजून घ्या हृदयासाठी कोणत्या सवयी फायदेशीर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
हृदयाच्या आरोग्याबद्दल जागरुक राहण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. हृदयविकार टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक पावलं उचलणं गरजेचं आहे. जाणून घेऊयात हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काय करावं ?
मुंबई : आज 29 सप्टेंबर.. आजचा दिवस World Heart Day म्हणून साजरा केला जातो. 2025 ची म्हणजे यावर्षीची World Heart Day ची संकल्पना Don't miss a beat अशी आहे. हृदयाच्या आरोग्याबद्दल जागरुक राहण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. हृदयविकार टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक पावलं उचलणं गरजेचं आहे. जाणून घेऊयात हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काय करावं ?
प्रदूषण, शारीरिक हालचालींचा अभाव, खाण्याच्या सवयी आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे हृदयरोगाची समस्या जास्त प्रमाणात जाणवत आहेत. हृदयरोग, ज्याला हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग म्हणूनही ओळखलं जातं. जगभरात आयुर्मान कमी होण्याचं हे प्रमुख कारण बनलं आहे. हृदयविकाराचा झटका हा जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे.
advertisement
हृदयविकाराच्या झटक्याची सुरुवातीची लक्षणं कोणती ?
हृदयविकाराच्या काही सुरुवातीच्या लक्षणांमधे छातीत दुखणं, दाब किंवा जडपणाची भावना यांचा समावेश होतो. खांदे, हात, पाठ आणि मान, जबडा यासारख्या शरीराच्या वरच्या भागात देखील वेदना जाणवू शकतात. अचानक घाम येणं आणि चक्कर येणं ही देखील हृदयविकाराच्या झटक्याची सुरुवातीची लक्षणं आहेत.
advertisement
श्वास घेण्यास त्रास होणं आणि खूप जास्त थकवा येणं ही देखील हृदयविकाराच्या झटक्याची सुरुवातीची लक्षणं आहेत. पोटदुखी किंवा मळमळ ही देखील हृदयविकाराची लक्षणं असू शकतात. जास्त चिंता, ताण ही देखील हृदयविकाराच्या सुरुवातीची लक्षणं आहेत.
advertisement
हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काय करावं ?
हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी संतुलित आहार आणि हिरव्या भाज्या खाव्यात.
तीस मिनिटं व्यायाम आणि योगा केल्यानं हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
धूम्रपान आणि मद्यपान हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं, म्हणून त्यांच्यापासून दूर रहा.
जास्त ताण हृदयाच्या आरोग्यावर देखील परिणाम करतो, म्हणून स्वतःला तणावमुक्त ठेवा. तणाव व्यवस्थापन करायला शिका.
advertisement
जास्त वजनामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, म्हणून वजन नियंत्रणात ठेवा. दररोज रात्री सात-आठ तास झोपणं देखील हृदयासाठी फायदेशीर ठरू शकतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 6:29 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
World Heart Day : हृदय निरोगी ठेवण्यासाठी या टिप्स लक्षात ठेवा, जागतिक हृदय दिनी समजून घ्या हृदयासाठी कोणत्या सवयी फायदेशीर