Heart Health : हृदयाला घातक पदार्थ करा आताच दूर, समजून घ्या हृदयासाठी आवश्यक गोष्टी

Last Updated:

जास्त तळलेले, साखरयुक्त आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं हृदयाला हानिकारक ठरू शकतं आणि हृदयविकारासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. म्हणूनच, खाण्याच्या सवयी वेळेवर बदलणं महत्वाचं आहे. 

News18
News18
मुंबई : आपल्या पोटात कोणते पदार्थ जातात यावर आपली प्रकृती अवलंबून असते. काही पदार्थांमुळे तब्येतीला धोका निर्माण होऊ शकतो. आज जागतिक हृदय दिनाच्या निमित्तानं समजून घेऊया हृदयाला त्रासदायक ठरु शकणारे पदार्थ.
फक्त मीठच नाही तर आणखी चार गोष्टींमुळे हृदयविकाराचा धोका शंभर टक्क्यांनी वाढतो. 99% लोक दररोज या गोष्टी खातात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका हमखास वाढतो. सध्याची जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या
सवयींमुळे हृदयरोगाचं प्रमाण वाढतंय.
जास्त तळलेले, साखरयुक्त आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं हृदयाला हानिकारक ठरू शकतं आणि हृदयविकारासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. म्हणूनच, खाण्याच्या सवयी वेळेवर बदलणं महत्वाचं आहे.
advertisement
तळलेले पदार्थ: चिप्स, वडे, भजी, समोसे आणि फ्राईज यांसारखे जास्त तळलेले पदार्थ खाणं हृदयासाठी धोकादायक ठरू शकतं, कारण त्यात ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स असतात, यामुळे खराब कोलेस्ट्रॉल वाढवून हृदयाला हानी पोहोचू शकते.
advertisement
जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यानं रक्तदाब वाढू शकतो, हृदयरोगाचं एक प्रमुख कारण आहे. प्रक्रिया केलेल्या आणि पॅकेज केलेल्या पदार्थांमध्ये मीठाचं प्रमाण जास्त असतं. म्हणून, हे पदार्थ खाणं टाळणं महत्वाचं आहे. जास्त मीठ खाल्ल्यानं हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.
advertisement
साखर: गोड पदार्थ, कोल्ड्रिंक्स आणि साखर जास्त खाल्ल्यानं रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू शकतं आणि वजन वाढू शकतं, ज्यामुळे हृदयरोग होऊ शकतो. दररोज गोड पदार्थ खाता तर आजपासून ही सवय बदला, कारण यामुळे शरीराला गंभीर नुकसान होऊ शकते.
लाल मांस आणि चरबीयुक्त मांस: जास्त चरबीयुक्त मांस, विशेषतः लाल मांस खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉल वाढू शकतं आणि हृदयाच्या धमन्यांमधे अडथळा निर्माण होऊ शकतो. दररोज लाल मांस आणि चरबीयुक्त मांसाचं सेवन करत असाल तर काळजी घ्या अन्यथा हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heart Health : हृदयाला घातक पदार्थ करा आताच दूर, समजून घ्या हृदयासाठी आवश्यक गोष्टी
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement