Garlic Benefits : लसणाचे आरोग्यकारक फायदे, त्वचेच्या अनेक समस्यांपासून मिळेल आराम
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
लसणातले अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. मुरुमांचं प्रमाण रोखण्यासाठी देखील लसूण फायदेशीर ठरू शकतात.
मुंबई : आपल्या देशात कोट्यवधी घरात लसणाचा वापर होतो. चटणी, वाटण, भाज्या, वरण यात लसूण वापरला जातो. यामुळे पदार्थाची लज्जत वाढते. अन्नाची चव वाढवण्याबरोबरच काही आजारांशी लढण्यासाठी किंवा शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कच्चा लसूण खाणं उपयुक्त असतं.
याचबरोबर लसूण त्वचेसाठीही खूप फायदेशीर ठरू शकतो. योग्यरित्या वापरला तर चेहऱ्यासाठीही लसूण फायदेशीर आहे. अनेक आजारांपासून आराम देण्यासाठी लसूण वापरला जातो. लसूण आणि कोरफडीचा फेसपॅकही बनवता येतो.
advertisement
अनेक त्वचारोगतज्ज्ञांनी लसणाचे असंख्य फायदे सांगितले आहेत. लसणातले अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. मुरुमांचं प्रमाण रोखण्यासाठी देखील लसूण फायदेशीर ठरू शकतात.
रक्त शुद्धीकरण - लसूण खाल्ल्यानं रक्त शुद्ध होतं, कारण त्यात अँटीफंगल गुणधर्म असतात. रक्त शुद्ध झाल्यानं त्वचा चमकदार होते आणि मुरुमासारख्या समस्या टाळता येतात. लसूण खाल्ल्यानं त्वचेवरील जळजळ कमी होऊ शकते. काळे डाग असलेल्यांसाठीही लसूण फायदेशीर ठरू शकतो.
advertisement
लसणाचा वापर कसा करावा -
लसूण अनेक प्रकारे वापरता येतो. त्याचे फायदे मिळवण्यासाठी भाज्यांमधे लसूण घालता येईल. चमकदार त्वचेसाठी, दररोज लसूणची एक पाकळी खाऊ शकता. काही लोक फेस पॅक बनवून तो लावतात. दूध, कोरफड आणि ग्लिसरीनमध्ये काही लसणाच्या पाकळ्या मिसळून पेस्ट बनवली जाते.
advertisement
लसूण थेट चेहऱ्यावर लावणं टाळावं, यामुळे त्वचेची जळजळ कमी होते. कोणताही नवीन फेसपॅक लावण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा. हा फेसपॅक आठवड्यातून एक - दोन वेळा वापरु शकता.
कोरफडीप्रमाणेच मध वापरुनही लसूण फेसपॅक तयार करता येतो. लसणाच्या दोन पाकळ्या वाटून घ्या. या तयार झालेल्या पेस्टमधे मध मिसळा. हा फेसपॅक पंधरा-वीस मिनिटं चेहऱ्यावर लावा. नंतर कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवा. मधामुळे चेहऱ्याला ओलावा मिळतो. चेहऱ्याला योग्य प्रमाणात आर्द्रता मिळणं आवश्यक आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 30, 2025 2:25 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Garlic Benefits : लसणाचे आरोग्यकारक फायदे, त्वचेच्या अनेक समस्यांपासून मिळेल आराम