मध आणि काळी मिरी हे भारतीय स्वयंपाकघरात आढळणारे दोन घटक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. काळी मिरी दररोज मधात मिसळून खाणं शरीरासाठी फायदेशीर आहे.
Winter Care : कोरड्या हवेतही केस राहतील मजबूत, या टिप्सचा होईल फायदा
काळ्या मिरीमधे मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, जस्त आणि मॅंगनीज सारखी खनिजं असतात. त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई आणि बी-कॉम्प्लेक्स सारखी जीवनसत्त्वं देखील असतात.
advertisement
मधात जीवनसत्त्वं, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, अमीनो एसिड आणि फिनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात.
दोन काळी मिरी बारीक करा. एक चमचा मधात मिसळा आणि खा.
रक्तदाब - रक्तदाबाचा त्रास असेल तर दररोज मधासह काळी मिरी खाऊ शकता, कारण त्याचे गुणधर्म रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.
Banana: केळ रोज खावं का ? केळ खाल्ल्यानं वजन कमी होतं का ? रोज किती केळी खावीत ?
सर्दी आणि खोकला - सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर झोपण्यापूर्वी काळी मिरी मधात मिसळून खा. यामुळे खोकला आणि सर्दीपासून आराम मिळू शकतो. काळी मिरी कफ बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहे. मधामुळे घशाला आराम मिळतो, यामुळे खोकला कमी होतो.
त्वचा - मध आणि काळी मिरीमुळे त्वचेचंही रक्षण होतं. हे मिश्रण खाल्ल्यानं त्वचा कोरडी होण्यापासून संरक्षण होतं.
पचन - पचनाच्या समस्यांचं निराकरण आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी, तुम्ही काळी मिरी मधासह खाऊ शकता.
थंडीचे दिवस सुरु झालेत त्यामुळे घसा खवखवणं, घसा दुखणं यावर हे मिश्रण उत्तर आहे. काळी मिरी पावडर तूप - मधात मिसळून खाल्ल्यानं घशाला आराम मिळतो. सर्दी - खोकल्याबरोबरच दम्यावरही हे मिश्रण उपयुक्त आहे.
