सकाळी रिकाम्या पोटी कडुनिंबाची पानं खाल्ली तर शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. मौखिक आरोग्याबरोबरच रक्तातील साखर नियंत्रण, पचनाच्या समस्या, संसर्ग प्रतिबंध यासाठीही कडुनिंबाची पानंं फायदेशीर ठरतात. कडुनिंबातला तुरट रस रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरतो, यामुळे मधुमेहाचं प्रमाण नियंत्रित राहतं. यातल्या फायबरमुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. शरीर शुद्धीकरणासाठीही कडुनिंबाची पानं फायदेशीर ठरतात.
advertisement
Overthinking : अतिविचारांवर ठेवा नियंत्रण, मानसिक आरोग्यावर ताबा मिळवणं शक्य, या टिप्स ठरतील उपयुक्त
मौखिक आरोग्य -
कडुनिंबाच्या पानांमुळे दातदुखी, हिरड्यांची सूज आणि तोंडातील व्रण यासारख्या तोंडाच्या समस्या कमी करण्यास मदत होते. दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी कडुनिंबाची टूथपेस्ट देखील वापरू शकता.
त्वचेच्या समस्या -
सकाळी रिकाम्या पोटी कडुनिंबाची पानं खाल्ल्यानं त्वचेचं रक्षण होतं. कडुनिंबाच्या पानांत दाहक-विरोधी आणि जीवाणविरोधी गुणधर्म असतात. मुरुम, त्वचारोग यासारख्या त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करू शकते.
पचनाच्या समस्या-
पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी ही पानं उपयुक्त आहेत. पोट निरोगी ठेवायचं असेल तर कडुनिंबाची पानं नक्की खा. यातले गुणधर्म पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करू शकतात.
संसर्गाच्या समस्या-
हवामान बदललं की संसर्गाची समस्या वाढते. संसर्ग दूर करण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी मजबूत प्रतिकारशक्ती चांगली असणं खूप महत्वाचं आहे. सकाळी रिकाम्या पोटी कडुनिंबाची पानं खाल्ली तर त्यातले अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करू शकतात.