मूत्रपिंडं निरोगी ठेवण्यासाठी, वेळेवर आणि पुरेसं पाणी महत्त्वाचं आहेच पण यासह काही इतर पेयं देखील किडन्या निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. जाणून घेऊया या हेल्दी ड्रिंक्सबद्दल.
Intermittent Fasting : इंटरमीटंट फास्टिंग कोणी करावं ? काय काळजी घेणं गरजेचं ?
किडनीचे मुख्य कार्य म्हणजे रक्तातील कचरा गाळून मूत्रामार्गे बाहेर टाकणं. शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा रक्त घट्ट होऊन किडनीवर जास्त दबाव येतो. अशा परिस्थितीत, हायड्रेशन असेल तर लघवी पातळ होते, ज्यामुळे दगड म्हणजेच किडनी स्टोन तयार होण्याचा धोका कमी होतो आणि विषारी पदार्थ सहजपणे बाहेर पडतात. त्यामुळे पाण्याबरोबरच काही आरोग्यदायी पेयंही किडनीला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.
advertisement
नारळ पाणी - नारळ पाणी हा इलेक्ट्रोलाइट्सचा नैसर्गिक स्रोत आहे. यामुळे मूत्र स्वच्छ राहतं आणि शरीरातील अतिरिक्त सोडियम काढून मूत्रपिंडांना डिटॉक्सिफाय करणं शक्य होतं.
लिंबू पाणी - लिंबातील सायट्रिक ॲसिडमुळे किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध होतो. कोमट पाण्यात लिंबू मिसळून सकाळी पिणं किडनीसाठी खूप फायदेशीर आहे.
ग्रीन टी - ग्रीन टी मधील अँटिऑक्सिडंट्समुळे मूत्रमार्ग निरोगी राहतात.
बार्ली पाणी - आयुर्वेदात जवाचं पाणी किडनीसाठी खूप फायदेशीर मानलं जाते. यामुळे लघवी साफ करते आणि मूत्रपिंड संसर्ग होण्याचं प्रमाण कमी होतं.
Snoring : घोरणं कमी करण्यासाठी घरगुती उपाय, घोरणं बद होईल, गाढ झोप लागेल
क्रॅनबेरी ज्यूस - क्रॅनबेरीच्या रसामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गास प्रतिबंध होतो. हे बॅक्टेरिया मूत्राशय आणि मूत्रपिंडांना चिकटू देत नाही, ज्यामुळे किडनी निरोगी राहते.
काकडी - काकडीत पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि यामुळे शरीर थंड ठेवणं आणि किडनीतील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.
आल्याचा चहा - आल्याच्या चहामधे दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे किडनीचं संक्रमण आणि सूज कमी होते.
कोरफड ज्यूस - कोरफड ज्यूसमुळे शरीर डिटॉक्सिफाय करणं आणि मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी मदत होते. यामुळे लघवी साफ होते आणि किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी होते.
