जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगातील आठपैकी एक व्यक्ती लठ्ठ आहे. भारतात ही परिस्थिती आणखी चिंताजनक आहे, कारण तज्ज्ञांच्या मते, तीनपैकी एक भारतीय लवकरच लठ्ठ होऊ शकते. त्यातले एक आपण आहोत का हे तपासून घ्या.
Cinnamon Water : दालचिनीचं पाणी करेल शरीराचं रक्षण, मधुमेह नियंत्रण, पचनासाठीही फायदेशीर
या वाढत्या आरोग्य समस्येला तोंड देण्यासाठी, भारत सरकारच्या आयुष मंत्रालय प्रभावी आणि संशोधन-आधारित उपाय सुचवले आहेत. मंत्रालयानं नागरिकांना आयुर्वेद, योग आणि पंचकर्म यासारख्या नैसर्गिक उपायांचा अवलंब करण्याचं आवाहन केलं आहे.
advertisement
लठ्ठपणा हे भारतासाठी आव्हान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय, आणि लठ्ठपणाविरुद्धची लढाई सुरू करण्यासाठी स्वयंपाकाच्या तेलाचा वापर दहा टक्क्यांनी कमी करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. आयुष मंत्रालयाकडून यासाठी आहार, योग आणि पंचकर्म यासारख्या आयुर्वेदिक पद्धतींचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. यामुळे शरीरातील चयापचय सुधारण्यासाठी आणि वजन नियंत्रित करण्यासाठी मदत होते.
लठ्ठपणाचा सामना करण्यासाठी काही सोप्या आणि प्रभावी टिप्स
मंत्रालयाने या मोहिमेत सामील होऊन निरोगी भारतासाठी योगदान देण्याचं आवाहन केलं आहे. आयुष मंत्रालयानं लठ्ठपणाचा सामना करण्यासाठी काही सोप्या आणि प्रभावी टिप्स शेअर केल्या आहेत.
- दररोज योगासनं आणि प्राणायाम करा, ज्यामुळे शरीर लवचिक होतं आणि ताण कमी होतो.
Pigmentation : चेहऱ्यासाठी वापरा टोमॅटो, तांदुळाचं पीठ, जाणून घ्या पद्धत आणि फायदे
- तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं टाळा. ताजं, गरम आणि संतुलित अन्न खाण्यावर भर द्या.
- कोमट हर्बल पाणी प्या, ज्यामुळे पचन सुधारतं.
- चयापचय वाढवण्यासाठी पंचकर्म करा, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास आणि अशुद्धता काढून टाकण्यास मदत होते.
या उपायांमुळे लठ्ठपणा नियंत्रित होईलच तसंच पूर्ण आरोग्यासाठीही हे उपाय उपयुक्त आहेत.
