आज जागतिक फुफ्फुस दिनाच्या निमित्तानं, फुफ्फुसांबद्दल थोडी माहिती. कधीकधी फुफ्फुसांमध्ये द्रव भरू लागतो, ज्याला वैद्यकीय भाषेत पल्मोनरी एडेमा म्हणतात. ही स्थिती गंभीर असते आणि उपचार त्वरीत केले नाहीत तर प्राणघातक देखील ठरू शकते. म्हणूनच, याची सुरुवातीची लक्षणं ओळखणं आणि त्वरित वैद्यकीय मदत घेणं महत्वाचं आहे.
Health Tips : लोह, कॅल्शियमचा खजिना असलेले पदार्थ, थकवा होईल कमी, वाटेल फ्रेश
advertisement
सतत श्वास घेण्यास त्रास होणं आणि थकवा येणं ही त्यातली मुख्य लक्षणं आहेत. श्वास घेताना वारंवार त्रास होत असेल तर ही लक्षणं दिसू शकतात:
चालताना किंवा पायऱ्या चढताना तीव्र थकवा, झोपताना श्वास घेण्यास त्रास होणं, ही लक्षणं फुफ्फुसांमधे द्रव जमा झाल्याचे संकेत आहेत.
पाय आणि घोट्यांवर सूज - फुफ्फुसांत द्रव जमा झाल्यामुळे रक्ताभिसरण बिघडतं. यामुळे पाय आणि घोट्यांवर सूज येते. पायांना सूज येणं, बूट घट्ट वाटणं ही लक्षणं हृदय आणि फुफ्फुसांच्या आरोग्याशी संबंधित असू शकतात.
सतत खोकला आणि कफ - तुम्हाला सतत खोकला येत असेल आणि फेस किंवा गुलाबी श्लेष्मा येत असेल, तर तो हलक्यात घेऊ नका.
रात्रीच्या वेळी वाढणारा खोकला, छातीत जडपणा किंवा वेदना जाणवणं, ही लक्षणं फुफ्फुसांत सूज असल्याची असू शकतात.
Hair Care : पांढऱ्या केसांवर हे उपाय नक्की करुन बघा, केस नैसर्गिकरीत्या राहतील काळे
झोपेचा त्रास आणि अस्वस्थता - फुफ्फुसांत द्रव जमा होण्यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो. झोपे दरम्यान वारंवार जाग येणं. उशीच्या आधाराशिवाय झोप न येणं अशी लक्षणं जाणवू शकतात.
फुफ्फुसातील एडेमा म्हणजेच फुफ्फुसांत द्रवपदार्थ साचण्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.
श्वास घ्यायला त्रास होणं, पायांना सूज येणं, सतत खोकला येणं आणि झोपेचा त्रास जाणवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. जागतिक फुफ्फुस दिनानिमित्त, आपण आपल्या फुफ्फुसांच्या आरोग्याबद्दल जागरूक राहण्याची आणि आवश्यक ती तपासणी नियमितपणे करण्याची प्रतिज्ञा करणं गरजेचं आहे.