TRENDING:

Skin Care : दूध, फळांचे आईस क्युब आणतील चेहऱ्यावर चमक, वापरण्याची पद्धत आणि फायदे

Last Updated:

त्वचा चांगली आणि निरोगी हवी असेल तर त्यासाठी तशी काळजी घेणंही खूप महत्वाचं आहे. यासाठी बाह्य उत्पादनांव्यतिरिक्त आपल्या रोजच्या वापरातल्या गोष्टींनीही त्वचेची काळजी घेतली जाऊ शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही काय करता ? काही जण घरगुती उपाय करतात तर काही जण बाह्य उत्पादनांचा वापर करतात.
News18
News18
advertisement

त्वचा चांगली आणि निरोगी हवी असेल तर त्यासाठी तशी काळजी घेणंही खूप महत्वाचं आहे. यासाठी बाह्य उत्पादनांव्यतिरिक्त आपल्या रोजच्या वापरातल्या गोष्टींनीही त्वचेची काळजी घेतली जाऊ शकते.

आयुर्वेदिक पोषणतज्ज्ञ श्वेता शाह यांनी अलीकडेच त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमधे काही सोपे घरगुती उपाय शेअर केले आहेत. त्यापैकी सर्वात खास म्हणजे टोमॅटोचा रस. जेवणाची चव वाढवण्यासोबतच टोमॅटो त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकतो.

advertisement

Health Tips : सकाळी दिवस लवकर सुरु करण्यासाठी खास टिप्स, कामं वेळेत करा, स्वत:साठी वेळ द्या

टोमॅटो चेहऱ्यावर लावण्याचे फायदे -

टोमॅटोमधलं व्हिटॅमिन सी, लायकोपीन आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक त्वचेला टॅनिंग होण्यापासून वाचवतात, त्वचेवरची छिद्र कमी करतात आणि तेल नियंत्रणात देखील मदत करतात. अशा परिस्थितीत, तेलकट त्वचा असलेल्या किंवा मुरुमांची समस्या असलेल्यांसाठी टोमॅटोचा रस खूप फायदेशीर ठरू शकतो. यामुळे त्वचेवर नैसर्गिकरित्या चमक येते आणि यामुळे सूर्यप्रकाशामुळे होणारं त्वचेचं नुकसान कमी होतं.

advertisement

एक ताजा टोमॅटो चांगला धुवून घ्या. बारीक करुन त्याचा रस काढा. हा रस काही तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवा.

रस पूर्णपणे घट्ट होईल तेव्हा चेहऱ्यावर गोलाकार हालचालीत हलक्या हातानं मसाज करा. यामुळे त्वचा थंड होईल, त्वचेवरची छिद्रं घट्ट होतील आणि चेहऱ्यावरील रक्ताभिसरण वाढेल. ज्यामुळे त्वचा लगेच चमकू लागते.

Itching : केसांची निगा राखण्यासाठी टिप्स, टाळूची खाज होईल कमी, वाचा सविस्तर माहिती

advertisement

टोमॅटो व्यतिरिक्त, श्वेता शाह यांनी काही इतर नैसर्गिक स्किनकेअर क्यूब्स देखील सुचवले आहेत.

पपईच्या गराचे क्यूब्स - पपईतले एंजाइम मृत त्वचा काढून टाकण्यासाठी उपयुक्त आहेत. यामुळे डाग कमी होतात आणि त्वचेचा रंग एकसारखा होतो. यासाठी पपईचा रस काढून तो बर्फाच्या ट्रेमध्ये गोठवू शकता आणि या क्युबनी चेहऱ्यावर मालिश करू शकता.

advertisement

पुदिना, कोथिंबीर आणि कढीपत्ता - या तिन्ही औषधी वनस्पती त्वचेला डिटॉक्स करतात, यामुळे मुरुमं कमी होतात आणि यामुळे त्वचेवर तजेला येतो. या तिन्ही वनस्पतीही एकत्र करून बर्फाच्या ट्रेमध्ये गोठवू शकता आणि क्युबनं चेहऱ्यावर मालिश करू शकता.

केशर आणि कच्चं दूध - केसर आणि दुधाच्या मिश्रणानं चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : दूध, फळांचे आईस क्युब आणतील चेहऱ्यावर चमक, वापरण्याची पद्धत आणि फायदे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल