मधुमेहामुळे दीर्घकाळ शरीराला रक्तातील साखरेची पातळी प्रभावीपणे नियंत्रित करता येत नाही. मधुमेहाचे दोन मुख्य प्रकार आहेत: टाइप-1 आणि टाइप-2. जेव्हा शरीर इन्सुलिनच्या प्रभावांना प्रतिरोधक बनते तेव्हा टाइप 2 मधुमेह होतो.
जेव्हा शरीर इन्सुलिनच्या प्रभावांना प्रतिरोधक होतं किंवा जेव्हा स्वादुपिंड पुरेसं इन्सुलिन तयार करत नाही. हे बहुतेकदा लठ्ठपणा, खराब आहार आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे होतं. दोन्ही प्रकारच्या मधुमेहामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, ती अनियंत्रित राहिली, तर अनेक अवयवांवर परिणाम करणारे गंभीर आरोग्य धोके निर्माण होऊ शकतात.
advertisement
तरुणपणात रोज रात्री करा हे काम, म्हातारपणात राहाल निरोगी, संशोधकांनी शोधून काढला नवा उपाय
काही खाद्यपदार्थांमुळे टाईप-2 मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो.
1. पॅक्ड ज्यूस आणि शीतपेयं
पॅक्ड ज्यूस आणि शीतपेयांच्या चवीमुळे ताजेतवानं वाटत असलं तरी त्यात भरपूर साखर असते. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू शकतं आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
2. पांढरा ब्रेड आणि पीठ उत्पादनं
पांढरा ब्रेड, बेकरी उत्पादनं, कुकीज आणि केक यांसारख्या पिठापासून बनवलेल्या वस्तूंचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. ते लवकर पचतात आणि रक्तातील साखर वाढवतात.
3. कॅन फूड किंवा प्रोसेस फूड
कॅन फूड आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये मीठ आणि अतिरिक्त साखर असते. यामुळे केवळ साखरच नाही तर लठ्ठपणाही वाढू शकतो, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.
4. तळलेले पदार्थ
समोसे, भजी आणि फ्रेंच फ्राईज यांसारख्या तळलेल्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स आणि कॅलरीज जास्त असतात, ज्यामुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते.
5. फ्रुट स्मूदी
फ्रूट स्मूदी हेल्दी दिसू शकतात, पण त्यात अनेकदा साखर किंवा सरबत असते. यामुळे थेट रक्तातील साखर वाढू शकते.
6. फ्लेवर्ड योगर्ट
फ्लेवर्ड दह्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे मधुमेहाचा धोका सामान्य दह्यापेक्षा जास्त असतो.
7. न्याहारीसाठी तयार पॅकेज फूड
न्याहारीसाठीच्या बनवलेल्या बहुतेक पॅकेज केलेल्या पदार्थांमध्ये साखर आणि कार्बोहायड्रेट्स जास्त असतात.
8. फास्ट फूड
बर्गर, पिझ्झा आणि फास्ट फूडमध्ये कॅलरी आणि फॅट्स जास्त असतात, ज्यामुळे शरीरातील इन्सुलिनचा प्रभाव कमकुवत होतो.
9. पांढरा तांदूळ
पांढऱ्या तांदळात तंतूमयता कमी आणि कर्बोदकं जास्त असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास हातभार लागतो.
10. कॅन केलेल सूप आणि सॉस
यामध्ये सहसा साखर आणि मीठ जास्त प्रमाणात असतं. हे नियमितपणे खाल्ल्यानं वजन आणि रक्तातील साखरेवर वाईट परिणाम होतो.
मधुमेह टाळण्यासाठी टिप्स:
- अधिक फायबर युक्त अन्न खा.
- पॅकेज केलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा.
- अधिक पाणी प्या आणि शारीरिक हालचाली वाढवा.
- तुमच्या रक्तातील साखरेची नियमित तपासणी करा.
तुमचा आहार मधुमेह प्रतिबंध आणि व्यवस्थापनात मोठी भूमिका बजावतो. योग्य अन्नपदार्थ निवडून, तुम्ही तुमचं आरोग्य सुधारू शकता आणि मधुमेहाचा धोका टाळू शकता.