TRENDING:

कुत्रा चावल्यानंतरचे 24 तास महत्त्वाचे! या वेळेत रुग्णासोबत नेमकं काय घडतं?

Last Updated:

कुत्र्याची किती लाळ रुग्णाच्या त्वचेच्या संपर्कात आली, व्यक्तीच्या त्वचेवर जखम झाली आहे का, हे तपासणं आणि तिसरा प्रकार म्हणजे कुत्र्यानं किती त्वचा खेचून काढली हे तपासून त्यानुसार उपचार केले जातात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हिना आझमी, प्रतिनिधी
डॉग बाइट हा 3 प्रकारांमध्ये विभागला जातो.
डॉग बाइट हा 3 प्रकारांमध्ये विभागला जातो.
advertisement

देहरादून : कुत्रा हा सर्वात प्रामाणिक प्राणी आहे, तो घराचं रक्षण करतो, असं म्हणतात. म्हणूनच अनेक घरांमध्ये कुत्र्याचं स्थान हे अगदी कुटुंबातील सदस्याप्रमाणे असल्याचं पाहायला मिळतं. परंतु कुत्रा हा कितीही प्रामाणिक आणि जीव लावू वाटणारा प्राणी असला, तरी त्याच्या चावण्यानं प्रचंड वेदना होतात आणि वेदनादायी उपचार घ्यावे लागतात, हेही खरं आहे.

advertisement

अनेकजण कुत्रा चावल्यानंतर त्या भागाला हळद, मसाला किंवा कोलगेट लावतात. परंतु डॉक्टर सांगतात की, असं करणं त्वचेसाठी धोकादायक ठरू शकतं. कुत्रा चावलेल्या काही रुग्णांच्या जखमेत हळद असते, तर काहींच्या मसाला असतो. काहीजण तिथे मोठीच्या मोठी पट्टी बांधून येतात. ज्यामुळे जखमेत अडकलेल्या कुत्र्याच्या लाळेतील जंतू कमी होत नाहीतच, मात्र जास्त वाढतात. हे जंतू शरिरातील टिश्यूज आणि रक्तापर्यंत पोहोचल्यास आरोग्यासाठी धोकादायक असतं.

advertisement

हेही वाचा : AC मधून लगेच बाहेर जाऊ नये! मेंदूची नस फुटून होऊ शकतो रक्तस्त्राव

डॉक्टर सोनिया यांनी याबाबत सविस्तर माहिती दिलीये. त्या म्हणाल्या, कुत्रा चावल्यास रेबीज आजार होऊ शकतो. हा आजार जीवघेणा असतो, कारण त्यावर विशिष्ट असा उपचार उपलब्ध नाहीये, त्यामुळे त्यात रुग्णाचा जीव जाऊ शकतो. डॉग बाइट हा 3 प्रकारांमध्ये विभागला जातो. कुत्र्याची किती लाळ रुग्णाच्या त्वचेच्या संपर्कात आली, व्यक्तीच्या त्वचेवर जखम झाली आहे का, हे तपासणं आणि तिसरा प्रकार म्हणजे कुत्र्यानं किती त्वचा खेचून काढली हे तपासून त्यानुसार त्यावर उपचार केले जातात.

advertisement

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्यानं हल्ला केलेला भाग कमीत कमी 10 मिनिटं साबण लावून पाण्यानं स्वच्छ धुवावा. 10 ते 15 मिनिटं जखम धुतल्यानंतर त्यावर अँटीसेप्टिक औषध लावावं. शिवाय 24 तासांच्या आत डॉक्टरांकडे जाऊन टीटनेस आणि रेबीस या दोन्ही आजारांवरील इंजेक्शन घ्यावे. काही लोक कुत्रा चावलेल्या जागी टाके मारतात जे चुकीचं आहे. त्यामुळे असं करू नये. जखम धुतल्यानंतर ताबडतोब डॉक्टरांना गाठावं. त्यांच्याच सल्ल्यानं औषधं घ्यावी. शिवाय लक्षात घ्या, कुत्रा चावलेल्या रुग्णाला मांसाहार आणि मसालेदार अन्नपदार्थांपासून दूरच ठेवा.

advertisement

सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी कोणत्याही आजारावर स्वतः डॉक्टरांशी चर्चा करूनच उपचार घ्यावे. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
कुत्रा चावल्यानंतरचे 24 तास महत्त्वाचे! या वेळेत रुग्णासोबत नेमकं काय घडतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल