AC मधून लगेच बाहेर जाऊ नये! मेंदूची नस फुटून होऊ शकतो रक्तस्त्राव
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
जे लोक एसीमधून कडक उन्हात जातात, त्यांना ब्रेन हॅमरेजचा धोका सर्वाधिक असतो. ब्रेन हॅमरेजचं सर्वात मोठं कारण असतं वातावरण बदल.
आकांक्षा दीक्षित, प्रतिनिधी
दिल्ली : यंदाच्या उन्हाने पार सर्वांचाच घाम काढला. हा उन्हाळा अगदी सोसेनासा झाला. अनेकजणांनी नवा एसी, नवा कूलर घेतला, तेव्हा कुठे शांत झोप लागली. परंतु तुम्हाला माहितीये का, एसीमधून थेट उन्हात गेल्यावर ब्रेम हॅमरेजचा धोका असतो. स्वतः डॉक्टरांनी याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.
डॉक्टर हर्षलता कोहली यांनी सांगितलं की, ब्रेन हॅमरेजचं सर्वात मोठं कारण असतं वातावरण बदल. जे लोक एसीमधून कडक उन्हात जातात, त्यांना ब्रेन हॅमरेजचा धोका सर्वाधिक असतो. वयाच्या 40-60 वर्षात हा त्रास होऊ शकतो.
advertisement
जर बीपी आणि डायबिटीज असेल, तर व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती आधीच कमकुवत असते. त्यामुळे लगेच ब्रेन हॅमरेज होऊ शकतं. ब्रेन हॅमरेजमध्ये मेंदूत रक्तस्त्राव होतो. म्हणजेच डोक्याच्या आतली रक्तवाहिनी फुटल्याने रक्त वाहतं.
उपाय काय करावा?
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा बाहेर जायचं असेल त्याआधी एसी बंद करावा. त्यानंतर 15 मिनिटांनी बाहेर पडावं. त्यामुळे शरिराचं तापमान बाहेरच्या तापमानाशी जुळतं. तसंच बाहेर गेल्यावर शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावं. लिक्विड पदार्थांचं सेवनही करावं.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आरोग्यासंबंधित कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
Location :
Delhi
First Published :
May 26, 2024 7:10 PM IST