दररोज चहा पिता, पण चहामुळेच आरोग्याचं किती नुकसान होतं माहितीये?

Last Updated:

डॉक्टर सांगतात की, चहा प्यावासा वाटतच असेल तर ग्रीन टी प्यावी. हा चहा अनेक आजारांवर भारी पडेल. परंतु ग्रीन टीसुद्धा अति पिऊ नये.

जास्त चहा प्यायल्याने दात पिवळे पडतात.
जास्त चहा प्यायल्याने दात पिवळे पडतात.
रुपांशू चौधरी, प्रतिनिधी
हजारीबाग : भारतात कोट्यवधी लोकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. काहीजण दिवसभरात 2-4 वेळाही चहा पितात. सकाळ-संध्याकाळचा चहा तर घरोघरी ठरलेलाच असतो. म्हणूनच चहा हे भारतातलं सर्वात लोकप्रिय पेय मानलं जातं. अनेकजण ऊर्जावान राहण्यासाठी चहा पितात. चहा प्यायल्याने झोप उडते असं म्हटलं जातं. परंतु जास्त चहा आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. असे अनेक आजार आहे, ज्यांनी पीडित असाल तर चहा आहारातून वगळायला हवा, असं आयुर्वेद सांगतं.
advertisement
डॉक्टर मकरंद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चहाचे शरिरावर अनेक दुष्परिणाम होतात. जे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जाणवतात. चहामुळे झोप उडते, त्यामुळे निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो. झोप पूर्ण न झाल्याने अशक्तपणा येऊ शकतो.
एकूणच चहामुळे स्लिप सायकल बिघडतं. मग काहीजणांना अस्वस्थ वाटतं, उलटीसारखं होतं. दिवसभरातून अति चहा प्यायल्यास पोटाचे विकार होऊ शकतात. अपचनाचा सामनाही करावा लागू शकतो.
advertisement
जास्त चहा प्यायल्याने दात पिवळे पडतात. जुलाब लागू शकतात. डॉक्टर सांगतात की, चहा प्यावासा वाटतच असेल तर ग्रीन टी प्यावी. हा चहा अनेक आजारांवर भारी पडेल. परंतु ग्रीन टीसुद्धा अति पिऊ नये.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित असली, तरी कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्यापूर्वी आपण स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
दररोज चहा पिता, पण चहामुळेच आरोग्याचं किती नुकसान होतं माहितीये?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement