कोल्हापूर : बऱ्याच जणांनी औदुंबर जलाविषयी ऐकले असेल. परंतु, या औदुंबराच्या जलाचा कसा आणि किती फायदा होतो? हे कदाचित खूप कमी लोकांना ठाऊक असेल. इतर झाडांप्रमाणे औदुंबराच्या झाडाची मुळे देखील जमिनीखाली पाणी शोषून घेण्याचे काम करतात. औदुंबराच्या झाडाच्या मुळांनी शोषलेले पाणी हेच औदुंबराचे जल असते. याच पाण्याचे आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी अनेक उपयोग आहेत. याच बाबत कोल्हापुरातील आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. अनिलकुमार वैद्य यांनी सांगितले आहे.
advertisement
खरंतर उंबराच्या झाडालाच औदुंबर असेही म्हणतात. उंबराच्या झाडाचे उंबर आणि काकोडुंबर असे दोन प्रकार आहेत. तर उंबराचे झाड हे नदी काठावर किंवा जास्त पाणी असणाऱ्या ठिकाणी आढळते. उंबराच्या अर्थात औदुंबराच्या पाण्याबरोबरच झाडाची साल, फळ आणि काही प्रमाणात पानांचे देखील औषधी उपयोग आहेत. मात्र औदुंबराचे जल हे अनेक आजारांवर गुणकारी ठरु शकते, असे डॉ. अनिलकुमार वैद्य यांनी सांगितले आहे.
काश्मिरी गुलाबी चहा आता कोल्हापुरात, आरोग्यासाठीही फायदेशीर, रेसिपी पाहा
कसे मिळवतात औदुंबराचे जल?
खरंतर औदुंबराचे जल नैसर्गिकरित्या काढले जाऊ शकते. यामध्ये झाडाला कोणतीही हानी न करता झाडाच्या मुळांपासून पाणी काढले जाते. त्यासाठी योग्य अभ्यासाची गरज असते. या झाडाची मुळे हे अगदी खोलवर असल्यामुळे मुळांमधून पाणी काढणे अवघड असते. मात्र बरेच जण योग्य पद्धत वापरुन खोडाजवळून हे औदुंबर जल काढतात.
औदुंबर जलाचे उपयोग
1) शरीरातील दाह कमी करते : औदुंबराचे जल हे नैसर्गिक शितलक म्हणून वापरले जाते. शरीरातील उष्णता किंवा दाह कमी करण्यासाठी ते अत्यंत गुणकारी आहे.
2) स्त्री रोगावर उपयोगी : औदुंबराचे जल हे विशेष करून स्त्रीरोगावर उपयोगी ठरू शकते. स्त्रीबीज तयार होत नसल्यास हे पाणी पिल्याने स्त्रीबीज तयार होण्यास मदत होते. तसेच स्त्रियांच्या मासिक पाळीच्या दिवसांतील काही तक्रारी देखील या पाण्याच्या सेवनाने कमी होतात.
3) डोळ्यांसाठी गुणकारी : डोळ्यांसाठी देखील हे औदुंबराचे जल उपयुक्त ठरू शकते. रात्री झोपताना डोळ्यांमध्ये दोन दोन थेंब टाकल्यास कोरडेपणा कमी होऊन डोळ्यांना शीतलता मिळते.
4) फुटलेल्या कान, नाकातील रक्तस्रावासाठी उपयोगी : कान फुटला असताना कानामध्ये हे औदुंबर जल टाकल्यास नक्कीच गुणकारी ठरु शकते. तर कडक उन्हामुळे नाकातून रक्तस्त्राव होत असल्यासही हे औदुंबर जल नाकामध्ये टाकल्यास आराम मिळतो.
सकाळी रिकाम्या पोटी फळं खाणं खरंच योग्य की अयोग्य? आहार तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
याव्यिरिक्त डेंग्यूमध्ये या औदुंबर जलाच्या सेवनाने फायदा होऊ शकतो. मूत्रपिंडासंबंधित आणि पोटाच्या अनेक विकारांवर, पचनक्रियाही नियंत्रित ठेवण्यासाठी, निरोगी हृदयासाठी तसेच मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणामांसाठी हे जल उपयोगी ठरते. तर हे औदुंबराचे जल अर्धशिशीवर देखील अतिशय उपयुक्त ठरू शकते. एकूणच हे औदुंबर जल हे गुणधर्माने शित असल्यामुळे याचे सेवन शरीरातील थंडावा टिकवून ठेवण्यास मदत करते., अशी माहिती देखील डॉ. अनिलकुमार वैद्य यांनी दिली आहे.