ही देशी पावडर डोळे ठेवेल निरोगी
आयुर्वेदिक डॉक्टर रॉबिन शर्मा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट dr.sharmarobin वर एका पोस्टमध्ये एका पावडरबद्दल सांगितलं आहे, जी डोळे निरोगी ठेवू शकते. तुमच्या घरात ठेवलेल्या काही गोष्टींचं नियमित सेवन करून तुम्ही तुमचे डोळे दीर्घकाळ निरोगी ठेवू शकता.
पावडर कशी तयार कराल?
- बदाम - 100 ग्रॅम
- खडीसाखर - 100 ग्रॅम
- बडीशेप - 100 ग्रॅम
- काळी मिरी - 20 ग्रॅम
advertisement
आता हे सर्व घटक मिक्सरमध्ये टाकून बारीक करा. पावडर झाल्यावर काढून घ्या. ती एका बरणीत ठेवून घट्ट बंद करा. आता एक चमचा दूध मिसळून किंवा न मिसळता खा. तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन करू शकता. तुम्ही तुमच्या घरातील सर्व सदस्यांना देऊ शकता. तुम्ही मुलांनाही खायला देऊ शकता. यामुळे कोणतंही नुकसान होणार नाही. डोळ्यांशी संबंधित अनेक समस्यांपासून तुमची सुटका होईल. यासोबतच, ही पावडर तुमच्या त्वचा आणि केसांचं आरोग्यही सुधारेल.
तुमचे डोळे राहतील निरोगी
तुम्ही ही पावडर मुलांना खाऊ घातल्यास, त्यांचे डोळे नेहमी निरोगी राहतील. दृष्टी किंवा इतर कोणतीही समस्या त्यांना कधीही त्रास देणार नाही. शरीराला अनेक पोषक तत्वंही मिळतील. बडीशेप, बदाम, खडीसाखर किंवा काळी मिरी असो, हे सर्व अनेक प्रकारच्या पौष्टिक घटकांनी समृद्ध आहेत.
हे ही वाचा : Spices : चव आणि तब्येतीसाठी उपयुक्त - भारतीय मसाले, आरोग्यासाठी वरदान
हे ही वाचा : डाएट नाही, जिम नाही! तरीही 14 महिन्यांत या महिलेनं कमी केलं तब्बल 42kg, त्यामागचं नेमकं सिक्रेट काय?
