व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे श्वासाची दुर्गंधी जाणवते. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर त्याचा शरीराच्या ऊर्जा पातळीवर परिणाम होतो, ज्यामुळे तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. तसंच, हे जीवनसत्व रक्त निर्मिती, मज्जासंस्थेचं आरोग्य आणि शरीराच्या विविध कार्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं.
Fennel Seeds : बडिशेप आरोग्यासाठी वरदान, चव, सुगंधाबरोबरच आरोग्यासाठीही महत्त्वाची
advertisement
व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे मज्जासंस्थेमध्ये समस्या उद्भवू शकतात, जसं की हात आणि पायाला मुंग्या येणं किंवा हात पाय सुन्न होणं. याशिवाय व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे ॲनिमिया देखील होऊ शकतो, ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता आणि थकवा जाणवतो. त्याची कमतरता मानसिक आरोग्यावर देखील परिणाम करू शकते, जसे की नैराश्य, गोंधळ आणि चिंता असे त्रास जाणवतात.
Tomato Facial : घरच्या घरी करुन बघा टॉमेटो फेशियल, चेहऱ्याची त्वचा दिसेल तजेलदार
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात कशी कराल ?
बीफ, चिकन आणि टर्की खाल्ल्यानं व्हिटॅमिन बी-12 मिळू शकतं.
सॅल्मन, ट्राउट, ट्यूना आणि सार्डिनसारखे मासे हे व्हिटॅमिन बी-12 चे चांगले स्त्रोत आहेत.
अंड्याचा पांढरा भाग व्हिटॅमिन बी-12 चा चांगला स्रोत आहे.
दूध, दही आणि चीजमध्ये व्हिटॅमिन बी-12 चांगल्या प्रमाणात असतं.
व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता काही धान्य आणि वनस्पती-आधारित दूध (जसे की सोया, बदाम किंवा ओट मिल्क) खाऊन देखील भरून काढता येते.
