आरोग्य निरोगी ठेवणाऱ्या फळांमध्ये केळीचाही समावेश होतो. केळ्यामध्ये आढळणारं पोटॅशियम, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट शरीरासाठी फायदेशीर असतात. पण, केळीची सालं खराब समजून फेकून देत असाल तर थांबा, कारण त्याचे त्वचेसाठी अनेक फायदे आहेत.
केळीच्या सालींमध्ये त्वचा दुरुस्त करण्यासाठीचे अनेक गुणधर्म असतात. या सालींमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात आणि ते त्वचेचं नुकसान होण्यापासून बचाव करतात. ही सालं त्वचेवर लावल्यानं उन्हापासून त्वचेचं रक्षण होतं. या सालींमध्ये फॅटी ॲसिड देखील असतं आणि ते त्वचेला हायड्रेशन देण्याचं म्हणजेच आवश्यक आर्द्रता देण्याचं काम करतात.
advertisement
पाहूया चेहऱ्यावर केळीची सालं लावण्याची पद्धत आणि त्यामुळे होणारे फायदे...
केळीचं साल चेहऱ्यावर घासा -
केळीच्या सालीचा आतील भाग जसाच्या तसा चेहऱ्यावर चोळता येतो. साल चेहऱ्यावर चोळा, 20 ते 25 मिनिटं ठेवा आणि नंतर चेहरा धुवून स्वच्छ करा. यामुळे, चेहऱ्यावरचे काळे डाग कमी होतात आणि चेहरा चमकदार बनतो.
केळीच्या सालीचा फेस मास्क -
हा फेस मास्क त्वचा उजळण्यासाठी चांगला आहे. फेस मास्क बनवण्यासाठी तुम्हाला केळीची साल, मध आणि दही असं साहित्य लागेल. अर्ध्या केळीच्या सालाचे लहान तुकडे करा. त्यात एक चमचा मध आणि दही मिसळून पेस्ट बनवा. हा तयार फेस मास्क 20 मिनिटं चेहऱ्यावर लावल्यानंतर चेहरा धुवून स्वच्छ करा. त्वचा चमकदार दिसेल आणि चेहऱ्यावर साचलेली घाणही दूर होते. त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठीही या फेस मास्कचा उपयोग होतो.
Health Tips : कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे येतो खूप घाम? मोठं नुकसान होण्याआधीच सावध व्हा
केळीच्या सालीचा स्क्रब -
चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी केळीच्या सालीपासून स्क्रब बनवता येतो. हा स्क्रब बनवण्यासाठी केळीच्या सालीचे छोटे तुकडे करून त्यात अर्धा चमचा हळद मिसळा. त्यात थोडी साखर आणि मध टाका. नीट मिक्स केल्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातानं चोळा. 2 ते 3 मिनिटं चोळल्यानंतर हा स्क्रब चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटं तसंच राहू द्या. आता जर तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ केला तर तुम्हाला तुमच्या त्वचेवर ताजेपणा जाणवू लागेल. यामुळे त्वचेवरचे डाग कमी होतात आणि चेहरा तजेलदार दिसतो.
केळं आणि केळीची साल -
एका भांड्यात केळीचा तुकडा, केळीच्या सालीचे काही तुकडे आणि थोडा मध घालून पेस्ट बनवा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटं ठेवा आणि नंतर धुवा. त्वचा सुधारते आणि चमकदार दिसू लागते. हा फेस मास्क आठवड्यातून एकदा लावता येतो.