यामुळे काही तासांत तुम्हाला वेदनांपासून आराम मिळेल. बदलतं हवामान आणि प्रदूषणामुळे खोकला, सर्दी यांसारख्या समस्या वाढतायत. हवेतल्या बदलांचा पहिला परिणाम आरोग्यावर होतो. हवामान थोडे थंड झालं की, खोकला, सर्दी सारख्या समस्या सुरू होतात. त्याचबरोबर वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनसंस्थेशी संबंधित समस्याही निर्माण होतात. नाक बंद होणं, घसा दुखणं, डोकं दुखणं आणि खोकल्याचा त्रास जाणवतो.
advertisement
हा मसाला म्हणजे ओवा. स्वयंपाकघरातला हा मसाला आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात जे शरीराला हानी पोहोचवणाऱ्या घटकांना दूर ठेवतात. याव्यतिरिक्त, ओव्यात संसर्गवाढीला प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात आणि त्यात दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात.
Banana Peels for face - केळ्याचं साल टाकून देताय ? थांबा, चेहऱ्यासाठी बनवा खास मास्क
भाजलेला ओवा खा -
खोकला आणि सर्दीपासून आराम मिळवण्यासाठी भाजलेला ओवा खाणं चांगला पर्याय आहे. यासाठी थोडं काळं मीठ घेऊन त्यात ओव्याचे दाणे टाकून उकळा. एक ग्लास कोमट पाण्यासोबत एक चमचा भाजलेला ओवा खा.
ओव्याचं पाणी -
ओव्याचं पाणीही उपयुक्त ठरतं. हे पाणी बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा ओव्याचे दाणे टाकून उकळा. हे पाणी गाळून गरम करून प्यायल्यानं खोकला, सर्दीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. ओवा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवला तर हे पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी गरम करूनही पिऊ शकता. या दोन्ही पद्धतींमध्ये ओव्याचं पाणी करुन पिणं फायदेशीर ठरतं.
ओव्याचा काढा -
खोकला आणि सर्दीपासून आराम मिळवण्यासाठी ओव्याचा काढा बनवता येतो. हा काढा बनवण्यासाठी तुम्हाला
2 चमचे ओवा, तुळशीची काही पानं, एक चमचा काळी मिरी आणि एक चमचा मध लागेल. कढईमध्ये ओव्याची पानं, तुळशीची पानं, काळी मिरी आणि एक कप पाणी घालून 5 मिनिटं उकळा. एका कपमध्ये गाळून त्यात मध घाला. हा काढा सकाळी आणि संध्याकाळी प्यायला जाऊ शकतो. यामुळे शरीराला हानी पोहोचवणारे जीवाणू निघून जायला मदत होते आणि खोकला-सर्दीच्या समस्येपासून आराम मिळतो.
हिवाळ्यात तब्येतीला जपा, काळजी घ्या !