त्वचेची योग्य काळजी घेतली तर त्वचा तजेलदार होते आणि योग्य काळजी घेतली नाही तर महागडी उत्पादनंही विशेष परिणाम दाखवू शकत नाहीत. म्हणूनच घरगुती उपाय आजमावले जातात.
ग्रीन फेस पॅक
Skin Care: चेहऱ्यावर चमक येण्यासाठी सोपा उपाय, गुलाबजल आणि ई व्हिटॅमिननं चेहरा होईल तजेलदार
निसर्गातील छोट्या-छोट्या गोष्टी त्वचेला मोठे फायदे देऊ शकतात. हिरव्या रंगाचे फेस पॅक फक्त हिरव्या वस्तूंपासून बनवले जातात. हे फेस पॅक लावल्यानं त्वचा चमकदार दिसते. मुरुमांचे डाग कमी होतात, मुरुमांचं प्रमाण कमी होतं आणि चेहरा मॉइश्चराइज राहतो.
advertisement
कडुनिंबाचा फेस पॅक
कडुनिंबात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. कडुनिंबाच्या पानांमध्येही भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात. कडुनिंबाच्या फेस पॅकमुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतात आणि मुरुमही कमी होतात. कडुनिंबाची पानं बारीक करून त्यात मध घालून फेस पॅक तयार करा. हा फेस पॅक 20-25 मिनिटं चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवा.
Garlic : लसूण - अनेक व्याधींवर रामबाण उपाय, आरोग्यासाठी फायदेशीर
तुळशीचा फेस पॅक
तुळशीची पानं बारीक करून त्यात आवश्यकतेनुसार दही घाला. फेस पॅक बनवण्यासाठी तुम्ही तुळशीची पावडर देखील वापरू शकता. हा फेस पॅक 15 मिनिटं चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर धुवा. तुळशीतल्या औषधी गुणधर्मांमुळे त्वचेवरचे डाग कमी करण्यासाठी मदत होते. हा फेस पॅक आठवड्यातून एकदा लावता येतो.
ग्रीन टी फेस पॅक
ग्रीन टी मुरुम आणि वृद्धत्व कमी करण्याचे काम करते. ग्रीन टी फेस पॅक बनवण्यासाठी ग्रीन टीमध्ये मुलतानी माती मिसळा. पाण्यात मिसळून हा फेस पॅक तयार करा. एक चमचा मुलतानी माती आणि तीन चमचे ग्रीन टी घ्या.
काकडीचा फेस पॅक
काकडीमुळे त्वचेला थंडावा मिळतो. काकडी बारीक करून त्यात कोरफड घाला आणि फेस पॅक तयार करा.
हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि 15 ते 20 मिनिटं ठेवा आणि नंतर धुवा. या फेसपॅकनं त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. टोनर म्हणून काकडीचा रसही चेहऱ्यावर लावता येतो.
पालक फेस पॅक
व्हिटॅमिन ए, सी आणि के सह अनेक खनिजं पालकामध्ये आढळतात. पालक फेस पॅक बनवण्यासाठी पालक बारीक करून एका भांड्यात काढा. 2 चमचे पालक पेस्टमध्ये एक चमचा मध घालून पॅक बनवा. 20 मिनिटं चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर धुवा.
