जायफळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आयुर्वेदात जायफळ औषध म्हणून वापरलं जातं. जायफळात कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, जस्त आणि जीवनसत्त्वं असे अनेक गुणधर्म असतात.
१. पचन -
ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी जायफळाचं पाणी सेवन करणं खूप फायदेशीर मानलं जातं.
Almonds : पोषक घटकांचा खजिना - बदाम, बदामाची पावडर घालून प्या दूध, तब्येतीसाठी फायदेशीर
advertisement
२. झोप -
रात्री उशिरापर्यंत झोप न लागणं किंवा निद्रानाश असलेल्यांसाठी जायफळ पूड उपयुक्त आहे. दररोज जायफळ पाणी पिण्यास सुरुवात केली तर झोप सुधारण्यास मदत होऊ शकते.
३. प्रतिकारशक्ती -
जायफळात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात, जे शरीराला संसर्गापासून वाचवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. मजबूत प्रतिकारशक्ती शरीराला अनेक प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यास मदत करते.
Fat Loss Tips : पोटाचा घेर कमी करायचाय ? आधी या चुका टाळा, मग करा डाएट प्लान
४. त्वचा -
जायफळात वृद्धत्वविरोधी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठीही जायफळ पूड टाकून पाणी पिणं फायदेशीर आहे.
5. हृदय -
हृदय निरोगी ठेवण्यासाठी नेहमी आरोग्यदायी गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो. जायफळाचं पाणी रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
