Fat Loss Tips : पोटाचा घेर कमी करायचाय ? आधी या चुका टाळा, मग करा डाएट प्लान

Last Updated:

पोटाची चरबी वाढणं ही एक सर्वसामान्य समस्या आहे आणि यापासून सुटका मिळवण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जातो. पण, अनेकदा चुकांमुळे पोटाची चरबी कमी होण्याऐवजी वाढते.

News18
News18
मुंबई :  वजन कमी करणं, पोटावरची चरबी कमी करण्यासाठीचे अनेक उपाय तुम्ही ऐकले असतील आणि करतही असाल. काही वेळा अनेक उपाय फक्त ऐकून केले जातात आणि त्यात चुका होऊन अपेक्षित चित्र दिसत नाही. अशावेळी आहार तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
पोटाची चरबी वाढणं ही एक सर्वसामान्य समस्या आहे आणि यापासून सुटका मिळवण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जातो. पण, अनेकदा चुकांमुळे पोटाची चरबी कमी होण्याऐवजी वाढते.
1. फक्त व्यायामावर अवलंबून राहू नका. 
फक्त व्यायाम केल्यानं पोटाची चरबी कमी होईल असं अनेकांना वाटतं. पण पोटाची चरबी कमी करण्यासाठी व्यायामासोबतच खाण्याच्या योग्य सवयींची काळजी घेणं आवश्यक आहे.
advertisement
2. चुकीचा आहार
अनेकजण डाएटिंगच्या नावाखाली खाण्या पिण्याच्या सवयींमध्ये अचानक बदल करतात. पण, असं केल्यानं शरीराला आवश्यक पोषक द्रव्य मिळत नाहीत आणि त्यामुळे पोटावरील चरबी वाढण्याची शक्यता वाढते.
3. ताण
पोटाची चरबी वाढण्यामागे तणाव हे देखील एक कारण आहे. जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे पोटात चरबी जमा होण्यास मदत होते.
advertisement
4. झोपेचा अभाव
झोप न लागणे हे देखील पोटावरील चरबी वाढण्याचे कारण आहे. आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा शरीरातील हार्मोनल म्हणजेच संप्रेरकांचं संतुलन बिघडतं, त्यामुळे पोटात चरबी जमा होऊ लागते.
5. साखरयुक्त पेयांचा वापर मर्यादित करा
साखरयुक्त पेयांमध्ये भरपूर कॅलरीज असतात आणि त्यांच्या सेवनानं पोटाची चरबी वाढते. त्यामुळे ही पेयं पिणं थांबवा.
advertisement
पोटाची चरबी कमी करण्यासाठी काय करावं:
खाण्याच्या योग्य सवयी: फळं, भाज्यांचा आहारात योग्य समावेश
नियमित व्यायाम: दररोज किमान 30 मिनिटं व्यायाम करा.
तणाव कमी करा: तणाव कमी करण्यासाठी योग, ध्यान कसं करायचं शिकून घ्या.
पुरेशी झोप : दररोज ७-८ तासांची झोप घ्या.
साखरयुक्त पेय टाळा: साखरयुक्त पेय कमी करा किंवा पूर्णपणे बंद करा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Fat Loss Tips : पोटाचा घेर कमी करायचाय ? आधी या चुका टाळा, मग करा डाएट प्लान
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement