Diet Tips: अशक्तपणा दूर करण्यासाठी डाएट टिप्स, आहारात बदल केल्यानं राहाल फिट, वजनही वाढेल
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
आपल्या शरीरयष्टीसाठी, प्रकृतीसाठी आपला आहार खूप महत्त्वाचा आहे. अशक्तपणा दूर करायचा असेल आणि जर कोणाला वजन वाढवायचं असेल तर काही उपाय नक्की करता येतील. यामुळे तुमच्या आहारात मोठा बदल होणार असेल तर आहारतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
मुंबई : आजारपणामुळे किंवा धावपळीमुळे, तुम्ही खूप बारीक झाला असाल तर खाण्या पिण्यातले काही बदल उपयुक्त ठरतील. सकाळी दुधासोबत काही पदार्थांचा समावेश केला तर वजन हळूहळू वाढेल आणि अशक्तपणा दूर होईल.
आपल्या शरीरयष्टीसाठी, प्रकृतीसाठी आपला आहार खूप महत्त्वाचा आहे. अशक्तपणा दूर करायचा असेल आणि जर कोणाला वजन वाढवायचं असेल तर काही उपाय नक्की करता येतील. यामुळे तुमच्या आहारात मोठा बदल होणार असेल तर आहारतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
केळी, ओट्स, खजूर, सुका मेवा सकाळी दुधासोबत खाल्ल्यानं तुमचं वजन वाढेल आणि हाडंही मजबूत होतील.
advertisement
1. केळी
केळी हे भरपूर कॅलरी आणि पोषक तत्व असलेलं फळ. पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन सी देखील त्यात आढळतं. रोज सकाळी दुधासोबत केळी खाल्ल्यानं वजन वाढण्यास मदत होते.
2. खजूर
खजुरामध्ये लोह, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. पचनसंस्था निरोगी ठेवण्यास आणि वजन वाढविण्यासाठी याची मदत होते. रोज सकाळी दुधासोबत खजूर खाल्ल्यानं शरीराला ऊर्जा मिळते आणि हाडं मजबूत होतात.
advertisement
3. ओट्स
ओट्स फायबर आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. वजन वाढण्यासाठी आणि स्नायूंना बळकट करण्यासीठी हा पर्याय उपयुक्त आहे. रोज सकाळी दुधासोबत ओट्स खाल्ल्यानं पोट भरतं आणि भूक कमी होते.
Diet Tips : उन्हाळ्यात खाण्या पिण्याबद्दल हे नियम पाळा, तेलकट पदार्थ खाऊ नका, तब्येत राहिल व्यवस्थित
4. सुका मेवा
advertisement
बदाम, मनुका आणि अक्रोड यांसारख्या सुक्या मेव्यामध्ये भरपूर कॅलरी आणि पोषक घटक असतात. त्यामुळे वजन वाढण्यास आणि हाडं मजबूत होण्यास मदत होते. रोज सकाळी दुधासोबत ड्रायफ्रुट्स खाल्ल्यानं शरीराला ऊर्जा मिळते आणि त्वचा निरोगी राहते.
हे पदार्थ दुधासोबत खाल्ल्यानं वजन वाढण्यास मदत होते, हाडं मजबूत होतात, शरीराला ऊर्जा मिळते, पचनसंस्था निरोगी राहते, त्वचा निरोगी राहते.
advertisement
वजन वाढवण्यासाठी इतर टिप्स
रोज सकाळी नाश्ता जरूर करा.
दिवसातून 8-10 ग्लास पाणी प्या.
तणावाचं व्यवस्थापन कसं करायचं शिका.
पुरेशी झोप घ्या.
नियमित व्यायाम करा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 13, 2025 5:44 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Diet Tips: अशक्तपणा दूर करण्यासाठी डाएट टिप्स, आहारात बदल केल्यानं राहाल फिट, वजनही वाढेल