Spinach Juice : डोळे, हाडांसाठी उत्तम आहार, पालक ज्यूस प्या, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चांगला उपाय

Last Updated:

पालक ही हिरवी पालेभाजी, आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. पालकाचा ज्यूस प्यायल्यानं शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.

News18
News18
मुंबई : रोजच्या आहारात रंगीबेरंगी फळं आणि भाज्यांचा समावेश असावा असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. कारण यातून मिळणारे सर्व रस प्रकृतीसाठी आवश्यक आहेत. पालक ही हिरवी पालेभाजी आहारातला मुख्य घटक...पालकाच्या पानाचा एक ग्लास रस रिकाम्या पोटी पिणं शरीरासाठी उपयुक्त आहे.
पालक वापरुन अनेक पाककृती केल्या जातात. पालकाचं वैज्ञानिक नाव Spinasia oleracea आहे. भारतात पालकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पालकामध्ये पुरेशा प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात.
इतकंच नाही तर त्यात कॅल्शियम, सोडियम, क्लोरीन, फॉस्फरस, लोह, खनिज क्षार, प्रथिनं, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं, यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.
advertisement
पालकाचा रस घरी बनवण्याची कृती -
पालकाचा रस बनवण्यासाठी प्रथम पालक आणि पुदिन्याची पानं नीट धुवून घ्या. पालक चिरुन घ्या. न कापताही रसासाठी पानं मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. एका ग्लासमध्ये हे मिश्रण गाळून मग प्या. यात तुम्ही लिंबू पिळूनही पिऊ शकता.
advertisement
पालकाचा रस पिण्याचे फायदे -
1. हाडांसाठी उपयुक्त -
कमकुवत हाडांची समस्या तुम्हाला जाणवत असेल तर पालकाचा रस उपयुक्त ठरु शकेल. पालकामध्ये कॅल्शियम आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते.
advertisement
2. लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपयुक्त -
लठ्ठपणा आणि त्यामुळे होणारे आजार ही एक मोठी समस्या आहे. तुम्हीही वजन कमी करण्यासाठी उपाय शोधत असाल तर पालकाचा रस तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो. या रसात कॅलरीजचं प्रमाण खूपच कमी असतं.
३. डोळ्यांसाठी उपयुक्त -
पालकामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी आढळतात, जे प्रामुख्याने डोळ्यांच्या मॅक्युलर डिजेनेरेशनचा धोका कमी करण्यास मदत करतात. पालकाचा रस प्यायल्याने दृष्टी सुधारते.
advertisement
4. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त -
रोगांना दूर ठेवण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी, मजबूत प्रतिकारशक्ती असणं खूप महत्वाचं आहे. तुम्हालाही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायची असेल, तर तुम्ही पालकाचा रस घेऊ शकता.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Spinach Juice : डोळे, हाडांसाठी उत्तम आहार, पालक ज्यूस प्या, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चांगला उपाय
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement