TRENDING:

Diabetes : साखर नियंत्रणासाठी या पर्यायांचा करा वापर, मधुमेहाचं प्रमाण होईल कमी

Last Updated:

मधुमेहींना काही पदार्थ खाताना विचार करावा लागतो. अनेकदा नाश्त्यासाठी काय खावं असे प्रश्न मनात येतात. कारण अनेकदा पर्याय कमी होतात. कोणत्या पदार्थांमुळे, साखर वाढू शकेल याचा विचार करावा लागतो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांसाठी काही पर्याय आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मधुमेहींना काही पदार्थ खाताना विचार करावा लागतो. अनेकदा नाश्त्यासाठी काय खावं असे प्रश्न मनात येतात. कारण अनेकदा पर्याय कमी होतात. कोणत्या पदार्थांमुळे, साखर वाढू शकेल याचा विचार करावा लागतो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांसाठी काही पर्याय आहेत.
News18
News18
advertisement

मधुमेहाच्या रुग्णांच्या खाण्याच्या सवयी चांगल्या असतील तर रक्तातील साखर वाढण्याची भीती कमी असते.  मधुमेहींनी संतुलित आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे. खाण्याच्या सवयी योग्य असतील तर, खाल्ल्यानंतर रक्तातील साखर वाढण्याचा धोका कमी होतो. दिवसाची सुरुवात योग्य आहारानं केली तर उर्वरित दिवसही ऊर्जावान राहतो.

मधुमेही रुग्णांनी त्यांच्या आहारातील पोषक घटकांची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. न्याहारीमध्ये भरपूर फायबर आणि प्रथिनांचं प्रमाण चांगलं असणं गरजेचं आहे ज्यामुळे आरोग्य चांगलं राहतं.

advertisement

योग्य आहारामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही आणि रक्तातील साखरेच्या व्यवस्थापनात मदत होते.

मधुमेहींसाठी नाश्त्याचे पर्याय -

ओट्स -

मधुमेहाचे रुग्ण ओट्स खाऊन सकाळची सुरुवात करू शकतात. ओट्समध्ये भरपूर फायबर असतात. मधुमेह नियंत्रणासाठी फायबर फायदेशीर आहे. ओट्स, ब्लूबेरी, सुका मेवा यासोबतही खाऊ शकता किंवा ओट्स मसालाही खाऊ शकता.

Collagen : त्वचा, स्नायू, हाडांसाठी महत्त्वाचा घटक, कमतरतेमुळे बिघडू शकतं शरीराचं संतुलन

advertisement

अंडी - अंड्यामध्ये प्रथिनं असल्यानं हा नाश्त्यासाठी चांगला पर्याय आहे. अंड्यांमध्ये असलेली प्रथिनं रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात. हे खाल्ल्यानं पोट बराच काळ भरलेलं राहतं. उकडलेलं अंडही  तुम्ही नाश्त्यात खाऊ शकता.

दही आणि अंकुरलेले मूग

सकाळी कोंब आणि दही खाणं देखील मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. प्रथिनं आणि तंतूमयता असल्यानं हा नाश्ता आरोग्यासाठी निरोगी आहे. मुगाची उसळही करुन खाता येते तसंच मोड आलेल्या मुगामध्ये सॅलडही  घालून खाता येईल. मुगासोबत दही, त्यात चवीनुसार थोडी जिरेपूड टाकता येईल.

advertisement

Skin Care: त्वचेची जळजळ होईल कमी, काळी वर्तुळं, सुरकुत्या होतील गायब, तुरटी करेल जादू

डाळीच्या पिठाचं धिरडं

डाळीच्या पिठाचं धिरडं हा सुद्धा नाश्त्याचा एक चांगला पर्याय आहे. प्रथिनं असल्यानं हा नाश्ता रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे. बेसनाचं धिरडं चीला बनवण्यासाठी त्यात भरपूर भाज्या घाल. धिरडं हिरव्या चटणीसोबत खाता येईल.

advertisement

नाचणी डोसा

रक्तातील साखर नियंत्रणासाठी नाचणी डोसा खाऊ शकता. नाचणीमध्ये भरपूर फायबर, जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात. रक्तातील साखर कमी करण्यासाठी नाचणी डोसा प्रभावी आहे. नाचणीत थोडं तांदळाचं पीठ मिसळून डोसा तयार करता येतो. यामध्येही तुम्ही इतर पीठं टाकून डोसा करु शकता.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Diabetes : साखर नियंत्रणासाठी या पर्यायांचा करा वापर, मधुमेहाचं प्रमाण होईल कमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल