उन्हाळा जसजसा जवळ येतो तसतसे आपल्या खाण्याच्या सवयीही बदलू लागतात. या ऋतूमध्ये शरीराला थंड आणि हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं असतं. पण, अशा काही गोष्टी आहेत ज्या उन्हाळ्यात अजिबात खाऊ नयेत. कारण यामुळे शरीराचं तापमान वाढण्याची शक्यता असते. मसालेदार पदार्थ टाळून, पुरेसं पाणी पिणं, फळं, ताक दही खाण्यावर भर द्या.
उन्हाळ्यात कोणत्या गोष्टी टाळाव्यात -
advertisement
मसालेदार अन्न : मसालेदार अन्न खाल्ल्यानं शरीराचं तापमान वाढतं. यामुळे पोटात जळजळ, ॲसिडिटी आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात हलकं आणि सहज पचणारं अन्न खावं.
Digestion : पोटाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे पाच उपाय, पोटाचं आरोग्य उत्तम तर प्रकृती उत्तम
तळलेलं अन्न : तळलेलं अन्न खाल्ल्यानं शरीराचं तापमानही वाढतं. याशिवाय तळलेल्या अन्नामध्ये कॅलरीजचं प्रमाणही जास्त असतं, त्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो.
फास्ट फूड : फास्ट फूडमध्ये मैदा, तेल आणि मसाले जास्त प्रमाणात असतात. या गोष्टी शरीरासाठी हानिकारक असल्यामुळे त्या टाळल्या पाहिजेत.
चहा आणि कॉफी : चहा आणि कॉफीमध्ये कॅफिनचं प्रमाण जास्त असतं. कॅफिनमुळे डिहायड्रेशन होऊ शकतं त्यामुळेही शरीराचं तापमान वाढतं. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत उन्हाळ्यात चहा-कॉफीचं सेवन कमी करावं.
अल्कोहोल : मद्यपान केल्यानं शरीराचं तापमानही वाढतं. याशिवाय अल्कोहोल शरीराला डिहायड्रेट करतं.
Skin Care : त्वचेच्या आरोग्यासाठी करा तेलांचा वापर, त्वचेचं होईल संरक्षण
उन्हाळ्यात काय खावं ?
उन्हाळ्यात शरीराला थंड आणि हायड्रेट ठेवणारे पदार्थ खावेत. यासाठी तुम्ही फळं, भाज्या, दही, ताक आणि नारळ पाणी घेऊ शकता. या गोष्टी शरीराला थंड ठेवतात आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.
उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी या टिप्स लक्षात ठेवा :
भरपूर पाणी प्या.
हलके कपडे घाला.
उन्हात कमी बाहेर जा.
तणाव कमी करा.
उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी आपल्या खाण्याच्या सवयींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.