हजारीबाग : दिवसभरात आपल्या पोटात विविध पदार्थ जातात. आपण काही पदार्थ भूक लागली म्हणून खातो, तर काही पदार्थांची चव आवडली म्हणून ते आवडीने खातो. परंतु दिवसभरात कळत-नकळतपणे आपल्या शरिरात अनेक पदार्थ जातात, ज्यांची शरिराला खरंतर गरज नसते. हे पदार्थ वारंवार आहारात आल्यास त्यांचा आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ते पदार्थ नेमके कोणते आहेत, पाहूया.
advertisement
हजारीबागेतील आयुर्वेदिक डॉक्टर एस एल मिश्रा यांनी सांगितलं की, अन्नपदार्थांमधून शरिराला उपयुक्त व्हिटॅमिन्स आणि पोषक तत्त्व मिळणं आवश्यक असतं. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आजारांपासून आपलं रक्षण होतं. परंतु काही पदार्थ फक्त चवीला चांगले लागतात म्हणून आपण खातो, त्यामुळे बऱ्याचदा आपलं नुकसान होऊ शकतं.
हेही वाचा : उन्हात ग्लासभर ऊसाचा रस गटागट पिता? थांबा! काही दिवसांनी जाणवेल भयंकर त्रास
दररोज आलं खाऊ नये
जेवणात दररोज आल्याचा समावेश असणं आरोग्यासाठी धोकादायक आहे. शिवाय लाल मिरची पावडर, काळीमिरी, टोमॅटो, पॅक्ड फूड, रेड मीट, इत्यादी पदार्थही दररोज खाऊ नये. त्यांपासून पित्त होण्याचा धोका सर्वाधिक असतो. तसंच कोल्ड ड्रिंक, सोडा, साखर, मैदा, इत्यादी पदार्थ दररोज खाल्ल्यास पचनशक्ती कमकुवत होते. यामुळे कोलेस्ट्रॉल आणि चरबी वाढण्याचीही शक्यता असते. शिवाय हृदयरोगदेखील होऊ शकतो.
हेही वाचा : Watermelon: कलिंगडाचे जबरदस्त फायदे; पोटदुखी, BP, वजन होतं कमी!
'असे' राहा तंदुरुस्त
सुदृढ शरिरासाठी दररोज संतुलित आहार घेणं आवश्यक असतं. आहारात प्रोटीन, फायबर आणि व्हिटॅमिनयुक्त पदार्थांचा समावेश असायला हवा. शिवाय हिरव्या भाज्या मोठ्या प्रमाणात खाव्या. तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा उकडलेले पदार्थ खाण्यावर भर द्यावा.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा