उन्हात ग्लासभर ऊसाचा रस गटागट पिता? थांबा! काही दिवसांनी जाणवेल भयंकर त्रास

Last Updated:
उन्हाळ्यात रस्त्याने चालताना बहुतेकदा धाप लागते. सध्यातर उकाडा अतिशय वाढलाय. त्यामुळे रस्त्यात थांबून काहीतरी थंडगार प्यावं असं वाटतं. अनेकजण अशावेळी ऊसाचा रस पितात. बऱ्याचदा दोन-दोन ग्लास भरून हा रस प्यायला तरी जीवाला हायसं वाटत नाही. खरंतर ऊस शरिरासाठी फायदेशीर आहेच, परंतु त्याचा रस पिण्याला काही मर्यादा आहेत, अतिप्रमाणात हा रस शरिरात गेल्यास आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. (जितेन्द्र बेनीवाल, प्रतिनिधी / फरीदाबाद)
1/5
ऊसामध्ये मॅग्नेशियम, मॅगनीज, झिंक, आयर्न, कॅल्शियम आणि पोटॅशियमसारखे अनेक पोषक तत्त्व असतात. ज्याचा शरिराला फायदाच होतो. परंतु डॉक्टर सांगतात की, कोणताही पदार्थ प्रमाणात खाल्ला तरच त्याचे फायदे मिळतात, अतिप्रमाणात खाल्ल्यास वेदना होतात.

advertisement
2/5
ऊसाचा रस अतिप्रमाणात प्यायल्यास नेमका काय त्रास होतो, याबाबत डॉक्टरांकडून जाणून घेऊया. हरियाणाच्या फरिदाबादमधील डॉक्टर विजय सांगतात की, ऊसामध्ये कॅलरीचं प्रमाण जास्त असतं. त्यात जवळपास 270 कॅलरी आणि 100 ग्रॅम साखर असते. अर्थातच ऊसाच्या रसामुळे वजन वाढतं.

3/5
अतिप्रमाणात ऊसाचा रस पोटात गेल्यास स्थूलपणा येऊ शकतो. ऊसामध्ये पॉलीकोसॅनॉल नावाचं तत्त्व असतं. ज्यामुळे रक्त पातळ होतं. जे आरोग्यासाठी चांगलं असतं परंतु हेच नुकसानदायी ठरू शकतं.

4/5
रक्त पातळ झाल्याने शरिरावर कुठे जखम झाल्यास भरपूर रक्तस्त्राव होतो. दरम्यान, ऊसाच्या फायद्याबद्दल बोलायचं झाल्यास, कावीळ आजारावर ऊस अत्यंत रामबाण मानला जातो. त्यामुळे यकृतही सुदृढ राहतं. त्यात विविध अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे यकृताचं कार्य सुरळीत राहतं. शिवाय बिलीरुबीनचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास ऊसामुळे मदत मिळते.

5/5
कावीळ ही शरिरातील प्रोटिन्सवर भारी पडते. त्याचवेळी रक्तातलं बिलीरुबीनही वाढतं. ही समस्या दूर करून ऊसाच्या रसामुळे शरिरातली प्रोटिन्सची कमतरता झपाट्याने भरून काढता येते.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement